
नवी दिल्ली: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिका नेहमीच चुरशीची होते. सध्या दोन्ही संघात सिडनी मैदानावर तिसरा कसोटी सामना सुरू आहे. हा सामना या दोन्ही देशातील आजी-माजी खेळाडू आणि चाहत्यांसाठी नाही तर जगातील अन्य खेळाडूंसाठी देखील पाहणे उत्सुकतेचे असते. ऑस्ट्रेलियात त्यांचाच पराभव करण्याची क्षमता असलेल्या काही मोजक्या देशांमध्ये भारताचा समावेश होतो. असे असताना एका क्रिकेटपटूसाठी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांची मॅच पाहण्यापेक्षा बापाची जबाबदारी अधिक महत्त्वाची वाटेत. वाचा- गेल्या काही कसोटीत एकापाठोपाठ एक धमाकेदार शतकी खेळी करणारा न्यूझीलंडचा कर्णधार () याच्यासाठी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांचा कसोटी सामना पाहण्यापेक्षा मुलीचे डायपर बदलणे अधिक महत्त्वाचे वाटते. वाचा- भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा कसोटी सामना सुरू होण्यापूर्वी त्याने हे वक्तव्य केले. हा सामना पाहणे निश्चित उत्सुकतेचे ठरले असते. पण तुम्ही सर्व गोष्टी पाहू शकत नाही. आपल्या मुलीसोबत खेळताना किंवा तिचे डायपर बदलताना मला थोडा फार वेळ मिळेल. क्रिकेट मॅच पाहणे नेहमीच चांगले असते, मात्र तुम्ही एकाच वेळी सर्व गोष्टी पाहू शकत नाही. पाकिस्तानविरुद्ध नुकत्याच झालेल्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत केनने एक शतक आणि एक द्विशतक झळकावले होते. या खेळीमुळे त्याने आयसीसी क्रमवारीत फलंदाजांमध्ये अव्वल स्थान मिळवले. त्याने विराट कोहली आणि स्टीव्ह स्मिथ यांना मागे टकाले. तर पाकविरुद्धच्या विजयामुळे न्यूझीलंडने आयसीसीच्या क्रमवारीत ऑस्ट्रेलियाला मागे टाकत अव्वल स्थानावर झेप घेतली. वाचा- गेल्या १० वर्षात आयसीसी कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानावर पोहोचणारा न्यूझीलंड हा सहावा संघ ठरला आहे. न्यूझीलंडचे ११८ गुण आहेत. ऑस्ट्रेलिया ११६, भारत ११४ गुण तर इंग्लंड १०६ गुणांसह चौथ्या स्थानावर आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/39dPbDY
No comments:
Post a Comment