
सिडनी, : सिडनीमध्ये तिसरा कसोटी सामना सुरु होण्यापूर्वी भारताचे राष्ट्रगीत वाजले. सामना सुरू होण्याआधी जेव्हा सिडनी मैदानावर जेव्हा भारताचे राष्ट्रगीत सुरू झाले तेव्हा सिराजच्या डोळ्यातून आश्रू आले. सिडनीत राष्ट्रगीताच्या वेळी सिराज भावूक झाला होता. राष्ट्रगीत सुरु असताना आपल्या डोळ्यात अश्रू का आले, याचा खुलासा आता सुराजने केला आहे. हा क्षण क्रिकेट ऑस्ट्रेलियाने सोशल मीडियावर शेअर केला आणि तो व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाल्याचे पाहायला मिळाले. याबाबत सिराज म्हणाला की, " राष्ट्रगीत सुरु असताना मला माझ्या वडिलांच्या आठवण आली आणि त्यामुळेच मी भावुक झालो होतो. मी कसोटी क्रिकेट खेळावे, हे माझ्या वडिलांचे स्वप्न होते. हे त्यांचे स्वप्न आता साकार झाले आहे. जर आज ते असले असते तर... हाच विचार माझ्या मनात आला आणि माझ्या डोळ्यांतून अश्रू वाहायला लागले." सिराजच्या वडिलांचे भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा सुरू होण्याआधी निधन झाले होते. वडिलांचे स्वप्न होते की त्याने भारतीय संघाकडून खेळावे पण त्यांना मुलाला खेळताना पाहता आले नाही. सिराजने २६ डिसेंबर रोजी पदार्पण केले होते. त्याच्या एक महिना आधी २० नोव्हेंबर रोजी सिराजच्या वडिलांचे निधन झाले. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असल्यामुळे सिराजला वडिलांचे अंतिम दर्शन घेता आले नाही. मेलबर्न कसोटीत जेव्हा सिराजला भारतीय संघाची कॅप मिळाली तेव्हा त्याने ती वडीलांना समर्पित केली. भारतीय संघात स्थान मिळवून त्याने वडिलांचे स्पप्न पूर्ण केले. आजच्या सामन्यात जेव्हा राष्ट्रगीत सुरु असताना सिराजच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते, तो क्षण क्रिकेट ऑस्ट्रेलियाने टिपला आणि त्याचा व्हिडीओ आपल्या ट्विटरवर पोस्ट केला. सिराजचा हा व्हिडीओ आता चांगलाच व्हायरल झाल्याचे पाहायला मिळत आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा कसोटी सामना सिडनी क्रिकेट मैदानावर सुरू आहे. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेन याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताचा जलद गोलंदाज मोहम्मद सिराज ()ने चौथ्याच ओव्हरमध्ये मोठी विकेट घेतली. त्याने डेव्हिड वॉर्नरला ५ धावांवर बाद केले.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/35hd8t0
No comments:
Post a Comment