Ads

Wednesday, January 6, 2021

विराट कोहलीच्या अडचणी वाढणार, होऊ शकतो हा गंभीर आरोप

नवी दिल्ली : हा सध्या क्रिकेट खेळत नाही, कारण तो एकमेव कसोटी सामना खेळून भारतात परतला आहे. पण तरीही कोहलीच्या अडचणीत आता वाढ होऊ शकते, असे म्हटले जात आहे. कारण कोहलीवर आता एक मोठा गंभीर आरोप होऊ शकतो, असे म्हटले जात आहे. नेमकं काय आहे प्रकरण, पाहा...कोहलीने २०१९ साली एका कंपनीमध्ये निवेश केला होता. या कंपनीनी निवड आता आता बीसीसीआयच्या ऑफिशल किट स्पॉन्सर और मर्चेंटाइज पार्टनर म्हणून करण्यात आली आहे. त्यामुळे आता कोहलीवर परस्पर हितसंबंध जपल्याचा आरोप होऊ शकतो, असे दिसत आहे. कोहलीला फेब्रुवारी २०१९मध्ये गैलेक्टस फनवेयर टेक्नोलॉजीने 33.32 लाख रुपयांचे कंपलसरी कन्वर्टिबल डिबेंचर्स दिले होते. ऑनलाइन गेमिंग प्लैटफॉर्म मोबाइल प्रीमियर लीग ही गैलेक्टस फनवेयर टेक्नोलॉजी या कंपनीच्या मालकिची आहे. कोहली हा मोबाइल प्रीमियर लीग सदिच्छादूत आहे. त्यामुळे आता ही गोष्ट समोर आल्यावर कोहलीची चिंता वाढू शकते, असे म्हटले जात आहे. कोहलीच्या घरी जानेवारी महिन्यात पाळणा हलणार आहे. त्यामुळे कोहलीने ऑस्ट्रेलियामध्ये फक्त एकच कसोटी सामना खेळला असून तो भारतात परतला आहे. पण भारतात परतल्यावरही कोहलीची चिंता कमी झालेली नसून त्यामध्ये आणखीन वाढ झाल्याचेच यावेळी पाहायला मिळत आहे. त्यामुळे कोहली या प्रकरणावर आपले मत कधी व्यक्त करतो, याची उत्सुकता सर्वांनाच असेल. सेलिब्रिटी किड्सचं क्रेझ पाहाता अनुष्का आणि विराट यांनी त्यांच्या होणाऱ्या बाळासाठी काही महत्त्वाचे निर्णय घेतल्याचं अनुष्कानं सांगितलं.आम्ही बाळाला सोशल मीडियापासून दूर ठेवण्याचा निर्णय घेतल्याचं अनुष्कानं या मुलाखतीदरम्यान म्हटलं आहे. तर आम्हाला मस्ती करणारं बाळ नकोय, असंही ती म्हणाली. आमच्या घरात लहानमुलांचे लाड पुरवले जातातच, पण त्यांना मोठ्यांचा आदर करण्यासही शिकवलं जातं, असंही ती म्हणाली. ११ डिसेंबर २०१७ रोजी विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी राजेशाही थाटात लग्न केलं. इटलीत त्यांनी डेस्टिनेशन वेडिंग केलं होतं. त्यांच्या लग्नाचे फोटो समोर आल्यानंतर चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला होता. दोघं लग्नाआधी चार वर्ष रिलेशनशिपमध्ये होते. यावर्षी ऑगस्टमध्ये दोघांनी सोशल मीडिया अकाउंटवर ते आई- बाबा होणार असल्याची बातमी शेअर केली होती.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/38gUUtt

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...