
सिडनी, : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा कसोटी सामना पाहण्यासाठी सर्वच चाहते उत्सुक आहेत. पण हा तिसरा कसोटी सामना कधी, केव्हा आणि कुठे पाहू शकता, पाहा... भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा कसोटी सामना कधी सुरु होणार?भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा कसोटी सामना ७ जानेवारीला (गुरुवार) सुरु होणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा कसोटी सामना किती वाजता सुरु होणार आहे?भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा कसोटी सामना भारतीय वेळेनुसार पहाटे ५ वाजता सुरु होणार आहे. या सामन्याची नाणेफेक ही पहाटे ४.३० वाजता होणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा कसोटी सामना कुठे खेळवला जाणार आहे?भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा कसोटी सामना सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर खेळवला जाणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा कसोटी सामन्याचे लाइव अपडेट कुठे पाहू शकता?भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा कसोटी सामन्याचे लाइव अपडेट्स तुम्ही https://ift.tt/3bwobPV वर पाहू शकता. तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघ कसा असेल?असा आहे भारतीय संघ- अजिंक्य रहाणे (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, ऋषभ पंत (विकेटकिपर), रविंद्र जडेजा, आर अश्विन, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, नवदीप सैनी सिडनीत उद्यापासून होणाऱ्या कसोटी रोहित शर्मा आणि नवदीप सैनी यांचा संघात समावेश करण्यात आला आहे. दुसऱ्या कसोटीत जलद गोलंदाज उमेश यादव जखमी झाला होता. त्यामुळे त्याच्या जागी निवड समितीने नवदीप सैनीवर विश्वास दाखवला आहे. तो भारतीय संघाकडून कसोटीत पदार्पण करेल. उमेश यादवच्या जागी शार्दुल ठाकूर आणि टी नटराजन यांच्यात चुरस होती. पण संघ व्यवस्थापनाने सैनीवर विश्वास दाखवला आहे. भारताचा धडाकेबाज फलंदाज रोहित शर्माची तिसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघात निवड करण्यात आली आहे. पण या कसोटीत रोहित नेमका कोणत्या स्थानावर खेळणार, याबाबत कर्णधार अजिंक्य रहाणेने आपले मत स्पष्ट केले आहे. रोहितच्या स्थानाबद्दल अजिंक्य म्हणाला की, " रोहित शर्मासारखा अनुभवी फलंदाज भारतीय संघात दाखल झाला आहे. त्याचबरोबर रोहितने नेट्समध्ये कसून सराव केला आहे. रोहितने गेल्या काही सामन्यांमध्ये दमदार फलंदाजी केली आहे आणि त्याचाच फायदा संघाला झाला आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात रोहित सलामीवीर म्हणून खेळायला येईल."
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2XgC8wc
No comments:
Post a Comment