नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार याला शनिवारी हृदयविकाराचा सौम्य झटका बसला होता. त्यानंतर तो रुग्णालयात असून त्याच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली. गांगुली अजून रुग्णालयातच असून त्याला उद्या (७ जानेवारी) घरी सोडण्यात येणार आहे. वाचा- भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष गांगुलीला बसलेल्या हृदयविकाराच्या झटक्याने एका कंपनीने त्यांची जाहिरात बंद केली आहे. उद्योगपती गौतम यांच्या या कंपनीचा गांगुली ब्रँड एबेंसेडर आहे. हा कंपनीच्या फॉर्च्युन ऑइलची जाहीरात गांगुली करतो. पण जे तेल तुमच्या आरोग्यासाठी चांगले असते अशी जाहीरात गांगुलीकडून केली जाते त्यालाच हृदयविकाराचा झटका आल्याने कंपनीने सर्व जाहीराती थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. वाचा- Adani Wilmarचे डेप्युटी सीइओ अंग्शु मलिक यांनी मंगळवारी स्पष्ट केली की, माजी कर्णधार आणि अध्यक्ष गांगुलीच कंपनीचे ब्रँड एबेंसेडर असतील. पण सध्या या तेलाच्या जाहिराती थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. वाचा- शनिवार (२ जानेवारी) सकाळी घरात जिम वर्कआउट करताना गांगुलीला छातीत दुखू लागले. त्याला हृदयविकाराचा सौम्य झटका बसला होता. गांगुलीच्या हृदयतील रक्तवाहिन्यांमध्ये तीन ब्लॉकेज आढळले होते. त्यानंतर अँजिओप्लास्टी करण्यात आली. वुडलँड्स रुग्णालयाच्या एमडी आणि सीईओ रुपाली बसू यांनी सध्या गांगुलीची प्रकृती स्थिर आहे. त्यामुळे त्याच्यावर जी अँजिओप्लास्टी केली जाणार होती ती आणखी काही दिवस पुढे ढकलता येऊ शकते, असे म्हटले होते. वाचा- गांगुलीला आजच रुग्णालयातून घरी सोडले जाणार होते. पण त्यानेच एक दिवस रुग्णालयात थांबण्याची इच्छा व्यक्त केली. त्यामुळे आता तो उद्या घरी जाणार आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/392LLEk
No comments:
Post a Comment