नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि विद्यमान बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुलीच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आली आहे. कोलकातामधील वुडलँड्स रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या सौरवच्या प्रकृतीचे बुलेटिन प्रसिद्ध करण्यात आले. शनिवारी सकाळी सौरव गांगुलीला हृदयविकाराचा सौम्य झटका बसला होता. हेल्थ बुलेटिनुसार गांगुलीची प्रकृती आता चांगली आहे आणि तो स्थिर आहे. हेल्थ पॅरामीटर सर्व सामान्य असून त्याने झोप व्यवस्थीत घेतली आहे. रात्री गांगुलीच्या प्रकृतीत थोडे चढ उतार दिसले. त्याचा रक्तदाब ११०/७० इतका होता. हृदयचे ठोके ७० इतका होता. वाचा- गांगुलीने सकाळी नाष्टा घेतला आणि पेपर देखील वाचला. त्याने रुग्णालायतील कर्मचाऱ्यांशी गप्पा देखील मारल्या. सकाळी ECG काढण्यात आला आणि त्याचा ऑक्सिजन सपोर्ट काढण्यात आल्याचे सांगण्यात आले. गांगुलीच्या प्रकृतीची स्थिती लक्षात घेऊन अँजिओप्लास्टी करण्याचा निर्णय गेला होता. आता पुढील उपराच काय करायचे यासंदर्भात निर्णय सोमवारी घेतला जाणार आहे. पुढील काही दिवस गांगुली डॉक्टरांच्या देखरेखीखाली रुग्णालयात ठेवले जाणार आहे. दरम्यान, पंतप्रधान यांनी फोनवरून गांगुलीशी प्रकृतीसंदर्भात विचारपूस केली. उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी रुग्णालयात जाऊन गांगुलीची भेट घेतली. तर बीसीसीआयचे सचिव जय सहा, केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर हे कोलकातामध्ये दाखल झाले आहेत. वाचा- शनिवार सकाळी घरात जिम वर्कआउट करताना गांगुलीला छातीत दुखू लागले. त्याला हृदयविकाराचा सौम्य झटका बसला होता. गांगुलीच्या हृदयतील रक्तवाहिन्यांमध्ये तीन ब्लॉकेज आढळले होते. त्यानंतर अँजिओप्लास्टी करण्यात आली. त्याच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि राज्यपाल जगदीप धनखड शनिवारीच रुग्णालयात आले होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी फोनवरून त्याच्या प्रकृतीची चौकशी केली.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/38b0spt
No comments:
Post a Comment