सिडनी: india tour of australia मेलबर्न येथे एका रेस्टॉरेंटमध्ये जेवणासाठी गेलेल्या भारतीय खेळाडूंचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडिओनंतर संबंधीत पाच भारतीय खेळाडूंनी बायो बबल प्रोटोकॉल तोडल्याचा आरोप करण्यात आला. संबंधित घटनेची चौकशी क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून सुरू आहे. अशातच भारतीय खेळाडूंनी याआधी बायो प्रोटोकॉलच्या नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप ऑस्ट्रेलियातील मिडियाने केला आहे. वाचा- भारतीय संघाचा कर्णधार ( ) आणि ( )यांनी करोना प्रोटोकॉलचे उल्लंघन केले आहे, दावा ऑस्ट्रेलिया मीडियाने केला आहे. हार्दिक आणि विराट यांनी डिसेंबर २०२० च्या सुरूवातीला नियम मोडला होता. या दोघांनी सिडनी बेबी स्टोअरमध्ये खरेदी केली होती. या दुकाना दोघांनी एका महिले सोबत फोटो देखील काढला होता. सिडनीमधील बेबी विलेज या स्टोअरने त्यांचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोत विराट आणि हार्दिक एका महिलेसह फोट काढत असल्याचे दिसते. वाचा- या शिवाय ऑस्ट्रेलिया मीडियाने असा ही दावा केला आहे की, एडिलेड येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या एक आठवडानंतर काही भारतीय खेळाडू एका कॅफेमध्ये गेले होते. नियमानुसार कॅफेमध्ये या खेळाडूंनी मास्क घालणे अपेक्षित होते. पण त्यांनी ते घातले नव्हते. वाचा- भारतीय संघातील रोहित शर्मा, शुभमन गिल, ऋषभ पंत, पृथ्वी शॉ आणि नवदीप सैनी यांनी बायो बबल प्रोटोकॉलच्या नियमांचे उल्लंघन केल्यावरून त्यांना आयसोलेट करण्यात आले होते. पण सिडनीला जाण्याआधी त्यांची कोरना चाचणी नेगेटिव्ह आली आहे. त्यामुळे ते स्वतंत्रपणे नव्हे तर संपूर्ण संघासोबत सिडनीला रवाना होणार आहेत.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3892FSb
No comments:
Post a Comment