सिडनी: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीच्या चौथ्या दिवसाचा खेळ संपला असून अखेरच्या दिवशी भारताला विजयासाठी ३०९ धावांची गरज आहे. ऑस्ट्रेलियाने दुसरा डाव ३१२ धावांवर जाहीर केला आणि पहिल्या डावात ४०७ धावांच्या विजयाचे लक्ष्य भारताला दिले. पाचव्या दिवशी चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांना महत्त्वाची खेळी करावी लागणार आहे. वाचा- ऑस्ट्रेलियाने दिलेल्या ४०९ धावांचा पाठलाग करताना आणि (rohit sharma partnership) यांनी पहिल्या विकेटसाठी ७१ धावांची भागिदारी केली. या दोघांनी पहिल्या डावात ७० धावांची भागिदारी केली होती. सलग दुसऱ्या अर्धशतकी भागिदारीनंतर गिल ३१ धावांवर बाद झाला. भारताकडून परदेशात चौथ्या डावात पहिल्या विकेटसाटी ५० हून अधिक धावा करण्याची २००६ नंतरची ही पहिली वेळ आहे. २००६ साली वासीम जाफर आणि विरेंद्र सेहवाग यांनी वेस्ट इंडिज विरुद्ध १०९ धावांची भागिदारी केली होती. त्यानंतर परदेशात भारताच्या एकाही सलामीच्या जोडीला ५० हून अधिक धावा करता आल्या नाहीत. वाचा- ... शर्मा आणि गिल या जोडीने केलेले आणखी एक उल्लेखनीय कामगिरी म्हणजे या दोघांनी सलग दुसऱ्या डावात २० हून अधिक षटके खेळून काढली. याआधी २००४-०५ मध्ये विरेंद्र सेहवाग आणि गौतम गंभीर यांनी पाकिस्तानविरुद्ध बेंगळुरू येथे झालेल्या कसोटीत सलग दोन डावात २० हून अधिक षटके फलंदाजी केली होती. तेव्हा त्यांनी पहिल्या डावात २३.२ तर दुसऱ्या डावात २३.४ षटके खेळली होती. वाचा- ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत शर्मा आणि गिल जोडीने पहिल्या डावात २० षटके खेळली होती. तेव्हा १० वर्षानंतर प्रथमच भारताच्या सलामीच्या जोडीने आशिया खंडाबाहेर २० षटके खेळली होती.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/38uUYGg
No comments:
Post a Comment