Ads

Tuesday, January 5, 2021

पावसामुळे सुरू झाला क्रिकेटचा हा प्रकार; वाचा वनडे क्रिकेटच्या जन्माची गोष्ट

नवी दिल्ली: सध्या चाहत्यांची संख्या मोठी आहे. तरी देखील आज देखील अशा चाहत्यांची संख्या मोठी आहे जे कसोटी क्रिकेटला अधिक महत्त्व देतात. टी-२० क्रिकेटमुळे खेळाचा वेग वाढला असला तरी कसोटी क्रिकेटचे महत्व कमी झाली नाही. एक प्रकार जो ३ तासात संपतो आणि दुसरा जो पाच दिवस चालतो. या दोन्हीच्या मध्ये क्रिकेटचा आणखी एक प्रकार म्हणजे होय. वाचा- आजच्या दिवशी म्हणजे पाच जानेवारी रोजी पहिला आंतरराष्ट्रीय वनडे सामना खेळला गेला होता. या निमित्ताने जाणून घेऊयात जागतिक क्रिकेटमध्ये या फॉर्मेटची कशी काय सुरूवात झाली. वाचा- पहिली आंतरराष्ट्रीय वनडे मॅच पाच जानेवारी १९७१ रोजी इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया () यांच्यात झाली होती. सध्या वनडे क्रिकेट प्रत्येकी ५० षटकाचे असले तरी ही पहिली लढत प्रत्येकी ४० षटकांची झाली होती. मेलबर्न क्रिकेट मैदानावर झालेला हा सामना ऑस्ट्रेलियाने ५ विकेटनी जिंकला होता आणि इंग्लंडच्या जॉन एडरिचने पहिल्या सामन्यात सामनावीर पुरस्कार मिळवला होता. वाचा- वनडे क्रिकेटची सुरूवात ही नाइलाजाने झाली होती असे म्हणण्यास जागा आहे. १९७१ साली इंग्लंडचा संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेला होता. या दोन्ही संघात एशेस मालिके अंतर्गत सामने होणार होते. पण एक सामना पावसामुळे झालाच नाही. त्यामुळे कसोटी सामन्याऐवजी वनडे सामन्याचे आयोजन करण्यात आले. वाचा- क्रिकेट इतिहासातील या पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकला आणि गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. ४० षटकात इंग्लंडने फक्त १९० धावा केल्या. जॉन एड्रिच यांनी ८२ धावांची खेळी केली. ऑस्ट्रेलियाने विजयाचे लक्ष्य ३५व्या ओव्हरमध्ये पार केले. या सामन्यात इयान चॅपल यांनी ६० धावा केल्या. वाचा- ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्यातील पहिले तीन दिवस पावसामुळे वाया गेले. त्यामुळे सामना रद्द करण्यात आला आणि कसोटी ऐवजी प्रत्येकी ४० ओव्हरची वनडे मॅच खेळवण्याचा निर्णय झाला. वाचा- >> हा सामना पाहण्यासाठी ४६ हजार ६ इतके प्रेक्षक आले होते. >> तिकीट विक्रीतून ३४ हजार डॉलर इतकी कमाइ झाली होती. >> या सामन्यात प्रत्येक गोलंदाजाने एका षटकात ८ चेंडू टाकले होते. >> टॉम ब्रूक्स आणि लू रोव्हेन हे पहिल्या वनडेसाठीचे अंपायर होते >> वनडे क्रिकेटमध्ये जेफ्री बॉयकॉट यांनी पहिला चेंडू खेळला होता. आणि या प्रकारात आऊट होणारे ते पहिले फलंदाज ठरले >> ऑस्ट्रेलियाचे एलन थॉमसन यांनी पहिल्या वनडे क्रिकेटमधील पहिली ओव्हर टाकली होती


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/35bR2Ir

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...