मेलबर्न: india Tour Of Australia रेस्टॉरेंटमध्ये जेवण्यासाठी गेल्याने भारतीय संघातील पाच खेळाडूंवर गेल्या दोन दिवासत जोरदार टीका झाली होती. विशेषत: ऑस्ट्रेलिया मीडियाकडून हा विषय मोठा करण्यात आला. भारतीय संघाचा उपकर्णधार , , पृथ्वी शॉ, नवदीप सैनी आणि ऋषभ पंत यांनी बायो प्रोटोकॉलच्या नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप करण्यात आला होता. वाचा- रोहित शर्मासह पाच खेळाडूंचा फोटो एका भारतीय चाहत्याने सोशल मीडियावर शेअर केला होता. संबंधित चाहत्याने असा दावा देखील केला होता की पंतने त्याला मिठी मारली होती. सोशल मीडियावरील त्याच्या पोस्टने या पाच खेळाडूंना आयसोलेट करण्यात आले. तसेच भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आणि क्रिकेट ऑस्ट्रेलिया या घटनेची चौकशी करत असल्याचे म्हटले गेले होते. अशाच हा प्रश्न उपस्थित झाला होता की, चौकशी सुरू असताना हे पाच खेळाडू तिसऱ्या कसोटीसाठी उपलब्ध असतील का? वाचा- याबाबत आता सिडनी मॉर्निंग हेराल्डने दिलेल्या एका रिपोर्टनुसार चौकशी सुरू असाना देखील ही पाचही खेळाडू सिडनी कसोटीत खेळण्यासाठी उपलब्ध असतील. या पाचही खेळाडूंना कठोर प्रोटोकॉलसह अन्य खेळाडूंसोबत सराव करण्याची परवानगी दिली गेली आहे. त्याच बरोबर सोशल डिस्टसिंग ठेवण्याची ताकीद दिली गेली आहे. वाचा- जर भारतीय खेळाडूंनी नियम मोडले असले तर बीसीसीआयने त्यांच्यावर कारवाई करावी. कारण क्रिकेट ऑस्ट्रेलिया त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई करू शकत नाही. ते भारतीय खेळाडूंसोबत काम करत नाही, असे या रिपोर्टमध्ये म्हटले आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3b1DP8R
No comments:
Post a Comment