क्राइस्टचर्च: पाकिस्तानविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडचा कर्णधार () याने शानदार शतक झळकावले. पाकिस्तानने पहिल्या डावात सर्वबाद २९७ धावा केल्या. त्यानंतर न्यूझीलंडच्या पहिल्या तीन फलंदाजांना ७१ धावात माघारी पाठवत पाकिस्तानने चांगली सुरूवात केली. पण त्यानंतर कर्णधार विलियमसनने तो कसोटीतील क्रमांक एकचा फलंदाज का आहे हे दाखवून दिले. वाचा- केन विलियमसनने हेन्नी निकोलससह चौथ्या विकेटसाठी नाबाद २१५ धावांची भागिदारी केली. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा न्यूझीलंडने ३ बाद २८३ धावा केल्या होत्या. केनने क्रिकेट विश्वातील या दशकातील पहिले शतक झळकावण्याचा मान मिळवला. त्याने कसोटीतील २४वे शतक झळकावले. कसोटी सर्वाधिक शतक करणाऱ्या खेळाडूंमध्ये त्याने विरेंद्र सेहवाग, केव्हिन पिटरसन, जावेद मियादाद आणि जस्टिन लॅगर यांना मागे टाकले. त्याच बरोबर त्याने भारताचे महान फलंदाज सुनिल गावस्कर यांच्या ३५ आंतरराष्ट्रीय शतकांचा विक्रम मागे टाकला. केन विलियमसनच्या नावावर आता ३६ शतक झाली आहेत. त्याने कसोटीत २४ तर वनडेत १३ शतक केली आहेत. या शतकी खेळीत केनने पहिल्या ५० धावा १०५ चेंडूत केल्या तर अर्धशतक ते शतकी धावा फक्त ३५ चेंडूत पूर्ण केल्या. वाचा- वाचा- केनचे कसोटीमधील हे सलग तिसरे शतक ठरले आहे. त्याने वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी सामन्यात त्यानंतर पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या कसोटीत शतक केले होते. वेस्ट इंडिजविरुद्ध त्याने २५१ तर पाकविरुद्ध १२९ धावा केल्या होत्या. कसोटी करिअरमधील ७ हजार धावांचा टप्पा पार करण्यास त्याला आता फक्त ११ धावांची गरज आहे. वाचा- विलियमसनने न्यूझीलंडकडून कसोटीत सर्वाधिक वेळा ५० हून अधिक धावा करण्याचा विक्रम स्वत:च्या नावावर केला. त्याने ५६ वेळा ५० हून अधिक धावा केल्या आणि माजी कर्णधार स्टीफन फ्लेमिंगचा विक्रम मागे टाकला. आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमधील त्याचे हे तिसरे शतक आहे. वाचा-
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3hHtbFn
No comments:
Post a Comment