
सिडनी: steve smith भारताविरुद्धच्या सिडनी कसोटीत ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह स्मिथने पहिल्या डावात शानदार शतक झळकावले. बॉर्डर-गावस्कर मालिकेतील तिसऱ्या कसोटी सामन्यात त्याने २०१ चेंडूत कसोटी करिअरमधील २७वे शतक पूर्ण केले. भारताविरुद्धचे स्मिथचे हे आठवे शतक आहे. कसोटी मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात धावा न केल्याने स्मिथवर टीका झाली होती. पण आजच्या खेळीने त्याने टीकाकारांना उत्तर दिले आहे. वाचा- स्मिथने कसोटी क्रिकेटमध्ये सर डॉन ब्रॅडमन यांच्यानंतर सर्वात कमी डावात २७ शतक करण्याचा विक्रम केला. याबाबत त्याने विराट कोहली आणि सचिन तेंडुलकर यांना मागे टाकले. ब्रॅडमन यांनी ७०व्या डावात २७वे शतक झळकावले होते. तर स्मिथने १३६व्या डावात ही कामगिरी केली. कमी डावात २७ शतक करण्याबाबत त्याने विराट आणि सचिन यांना मागे टाकले. विराट आणि सचिन यांनी १४१व्या डावात २७वे कसोटी शतक पूर्ण केले होते. त्यानंतर भारताच्या सुनिल गावस्कर यांचा क्रमांक येतो त्यांनी १५४ डावात तर मॅथ्यू हेडनने १५७ डावात अशी कामगिरी केली होती. वाचा- वाचा- ऑस्ट्रेलियाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतक करणाऱ्या यादीत स्मिथ आता चौथ्या स्थानावर पोहोचला आहे. माजी कर्णधार रिकी पॉन्टिंग ७० शतकासह पहिल्या स्थानावर आहे. डेव्हिड वॉर्नर ४३ शतकासह दुसऱ्या, मॅथ्यू हेडन ४० शतकासह तिसऱ्या स्थानावर आहे. स्मिथने आतापर्यंत ३८ शतक केली आहेत. ते मार्क वॉसह संयुक्तपणे चौथ्या स्थानावर आहे. सिडनीतील शतकासह भारताविरुद्ध कसोटीत सर्वाधिक शतक करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत स्मिथचा समावेश झाला आहे. स्मिथचे हे भारताविरुद्धचे आठवे शतक आहे. त्याच्या आधी गॅरी सोबर्स, व्हीव रिचर्ड्स, रिकी पॉन्टिंग यांनी प्रत्येकी आठ शतक केली आहेत. पण या तिघांपेक्षा सर्वात कमी डावात स्मिथने ही कामगिरी केली आहे. सोबर्स यांनी ३०, रिचर्ड्स यांनी ४१ तर पॉन्टिंगने ५१ डावात ८ शतक केली होती.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2XiCEtH
No comments:
Post a Comment