सिडनी: ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत भारताचा सलामीवीर ( )ने करिअरमधील पहिले अर्धशतक झळकावले. शुभमनला मेलबर्न कसोटीत पदार्पणाची संधी मिळाली होती. तेव्हा त्याने मोठी धावसंख्या केली नसली तरी स्वत:ची क्षमता दाखवून दिली होती. आता सिडनीत त्याने अर्धशतक करून एक नवा विक्रम स्वत:च्या नावावर केला आहे. वाचा- ... मेलबर्नमध्ये शुभमनने पहिल्या डावात ४५ तर दुसऱ्या डावात नाबाद ३५ धावा केल्या होत्या. सिडनीत ऑस्ट्रेलियाच्या वेगवान गोलंदाजांचा सामना करताना त्याने रोहित शर्मासह पहिल्या विकेटसाठी ७० धावांची भागिदारी करत संघाला चांगली सुरूवात करून दिली. त्याने ८ चौकारांसह ५० धावा केल्या. अर्धशतकानंतर तो लगेच बाद झाला. वाचा- शुभमनच्या ही अर्धशतकी खेळी ऑस्ट्रेलियामध्ये भारताकडून सर्वात कमी वयात अर्धशतक झळकावण्याची कामगिरी त्याने केली. गिलने २१व्या वर्षी ही कामगिरी केली. वनडेत ऑस्ट्रेलियात रवी शास्त्री यांनी २२व्या वर्षी अर्धशतक झळकावले होते. टी-२०मध्ये केएल राहुलने २६व्या वर्षी अर्धशतक झळकावले आहे. वाचा- दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताने २ बाद ९६ धावा केल्या होत्या . भारताचा कर्णधार अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा मैदानात आहेत. भारत अद्याप २४२ धावांनी पिछाडीवर आहे. ऑस्ट्रेलियाचा फलंदाज स्टीव्ह स्मिथ (Steven Smith)चे शानदार शतक आणि भारताचा अष्टपैलू रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) गोलंदाजी ही दुसऱ्या दिवसाच्या डावाचे मुख्य वैशिष्ट ठरले. ऑस्ट्रेलियाने स्मिथच्या शतकाच्या जोरावर ३३८ धावा केल्या आहेत.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3q5TKaz
No comments:
Post a Comment