मेलबर्न: एखाद्या हॉटेलमध्ये जेवायला गेलाय आणि तुमच्या शेजारच्या टेबलवर रोहित शर्मा, , शुभमन गिल आणि नवदीप नैनी सारखे भारतीय संघातील स्टार खेळाडू बसले आहेत. भारतीय संघातील ज्या खेळाडूंना मैदानावर आणि टीव्हीवर पाहतो ते समोर दिसल्यावर तुमच्यासाठी ट्रीट ठरले. अशीच ट्रीट भारतीय संघाच्या एका चाहत्याला मिळाली. पण आता ही ट्रीट इंडिय इंडियाच्या खेळाडूंना अडचणीत आणू शकते. वाचा- भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. दोन्ही संघात चार पैकी दोन कसोटी सामने झाले आहेत. तिसरा कसोटी सामना सिडनीत होणार आहे. भारतीय संघ अद्याप मेलबर्नमध्ये आहे. टीम इंडियाचे चाहते जगभरात आहेत. मेलबर्न शहरात भारतीय चाहत्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. वाचा- भारतीय संघातील रोहित शर्मा, ऋषभ पंत, नवदीप सैनी आणि शुभमन गिल हे चार खेळाडू मेलबर्नमधील एका रेस्टॉरंटमध्ये जेवण्यासाठी गेले होते. त्या रेस्टॉरंटमध्ये या खेळाडूंजवळच्या टेबलावर बसलेल्या एका चाहत्याने त्यांचा व्हिडिओ शूट केला आणि सोशल मीडियावर पोस्ट केला. नवलदीप सिंह असे नाव असलेल्या या चाहत्याने व्हिडिओ शेअर करताना मला विश्वास बसत नाही की समोरच्या टेबलावर पंत,गिल आणि सैनी बसले आहेत. वाचा- त्यानंतरच्या ट्वीटमध्ये तो म्हणतो मला भूकतरी नाही पण तरी ऑर्डर केली आहे. जेणेकरून यांना पाहता येईल. वाचा- तिसऱ्या ट्वीटमध्ये नवलदीप सिंहने या चारही भारतीय खेळाडूंच्या जेवणाचे बिल दिल्याचे म्हटले आहे. त्याने बिलाचा फोटो शेअर करत म्हटले आहे की, त्यांना कल्पना देखील नाही मी मी बिल भरले आहे. अखेर माझ्या सुपरस्टारसाठी मी इतक तरी करू शकतो. चौथ्या पोस्टमध्ये नवलदीप म्हणतो, जेव्हा त्यांना कळाले की मी पैसे दिले आहेत. तर रोहित म्हणाला, पाजी पैसे घ्या चांगले वाटत नाही. त्यावर मी सांगितले हे माझ्याकडून आहे. पंतने मला मिठी मारली आणि तुम्ही पैसे घेतले तरच फोटो काढता येईल असे म्हटले. यावर मी पुन्हा सांगतले, नाही ते शक्य नाही. अखेर सर्वांनी फोटो काढले. पंतने जाताना माझ्या पत्नीला, जेवणासाठी धन्यवाद म्हटले. वाचा- नवलदीपच्या पोस्टची चर्चा सध्या सोशल मीडियावर जोरदार सुरू आहे. त्याने भारतीय खेळाडूंचे ११८.६९ ऑस्ट्रेलियन डॉलर (६ हजार ६८३ रुपये) बिल दिले. पण त्याच्या या पोस्टमुळे भारतीय संघ अडचणीत येण्याची शक्यता आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेला भारतीय संघ सध्या झोनमध्ये आहे. अशा परिस्थितीत हे खेळाडू बाहेर रेस्टॉरंटमध्ये जेवायला गेले. इतक नव्हे तर पंतने बायो बबलमध्ये नसलेल्या एका व्यक्तीला मिठी मारली. त्यामुळे आता या प्रकरणाची क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून चौकशी सुरू असल्याचे वृत्त समोर येत आहे. ऑस्ट्रेलियात कोरना व्हायरसचे संकट अद्याप कमी झालेले नाही. सिडनीत करोना रुग्णांची संख्या अधिक असल्याने भारतीय संघ ३१ डिसेंबरच्या ऐवजी ४ जानेवारी रोजी सिडनीला जाणार आहे. करोनामुळे सिडनी कसोटी मेलबर्नमध्ये घेण्याचा विचार क्रिकेट ऑस्ट्रेलिया करत होते. पण आता तिसरी कसोटी सिडनीतच होणार आहे. पंतच्या भारतीय चाहत्याला मिठी मारल्यामुळे त्याने बायोबबलच्या नियमांचे उल्लंघन गेल्याची चर्चा सुरू झाली आहे. द एजने दिलेल्या वृत्तानुसार बीसीसीआयने देखील या प्रकरणाची चौकशी सुरू केल्याचे म्हटले आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2LddfyC
No comments:
Post a Comment