
सिडनी, : कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी भारताचा कर्णधार अजिंक्य रहाणेने अष्टपैलू रवींद्र जडेजाला फक्त तीन षटकेच गोलंदाजी दिली. यानंतर काही काळ अजिंक्यला चाहत्यांनी ट्रोलही केले. पण एक कर्णधार म्हणून अजिंक्यने जडेजाच्या गोलंदाजीबाबत काही रणनिती नक्कीच आखली असणार. जडेजाने दुसऱ्या कसोटी सामन्यात चांगली गोलंदाजी केली होती. पण तिसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी जडेजाला फक्त तीनच षटके देण्यात आली. त्यानंतर चाहते अजिंक्यच्या नेतृत्वावर नाराज असल्याचे पाहायला मिळाले. पण या गोष्टीची काही कारणेही असतील, याचा विचार चाहत्यांनी यावेळी केला नाही. पहिल्या दिवशी सामना सुरु झाल्यावर काही वेळात पावसाचे आगमन झाले. त्यामुळे अजिंक्यने यावेळी वेगवान गोलंदाजीवर जास्त भर दिला. कारण पाऊस पडल्यावर वेगवान गोलंदाजांना मदत मिळत असते. त्यामुळे अजिंक्यने यावेळी जडेजाला जास्त गोलंदाजी दिली नाही. अजिंक्यने पहिल्या दिवशी जडेजाला जास्त गोलंदाजी दिली नाही, कारण सामन्याच्या दुसऱ्या दिवशी अजिंक्यला जडेजाकडून मोठ्या अपेक्षा असतील. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी जडेजाकडून जास्त गोलंदाजी करून घ्यायची असल्यामुळे कदाचित अजिंक्यने जडेजाला आज जास्त गोलंदाजी दिली नाही. त्यामुळे सामन्याच्या दुसऱ्या दिवशी जडेजा आणि अश्विन यांच्याकडून आपल्याला जास्त षटके पाहायला मिळू शकतात. त्यामुळे आज जडेजाला जास्त गोलंदाजी न देण्यामागे हे कारण असू शकते. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी अजिंक्यची ही रणनिती किती यशस्वी ठरते, याकडे आता चाहत्यांचे लक्ष असेल. भारताविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यातील पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाने २ बाद १६६ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टिम पेन याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णय योग्य ठरवत त्यांनी पहिल्या दिवसावर वर्चस्व राखले. ऑस्ट्रेलियाकडून पदार्पण करणाऱ्या आणि मार्नस लाबुशेन यांनी अर्धशतकी खेळी केली. पुकोव्हस्कीने पदार्पणातच अर्धशतक झळकावले. त्याला ऋषभ पंतने दोन वेळा जीवनदान दिले. अखेर भारताकडून पदार्पण करणाऱ्या ऑस्ट्रेलियाकडून पदार्पण करणाऱ्या पुकोव्हस्कीची विकेट घेतली. त्याने ११० चेंडूत ४ चौकारांसह ६२ धावा केल्या. त्यानंतर आलेल्या स्टीव्ह स्मिथ याने लाबुशेनसोबत तिसऱ्या विकेटसाठी नाबाद ६६ धावांची भागिदारी केली. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा ऑस्ट्रेलियाने २ बाद १६६ धावा केल्या. लाबुशाने ६७ धावांवर तर स्मिथ ३१ धावांवर नाबाद खेळत होते. भारताकडून सिराज आणि सैनी यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/39cMByj
No comments:
Post a Comment