
सिडनी, : अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली भारताने दुसरा कसोटी सामना जिंकला. पण त्यानंतरही अजिंक्य कर्णधार असताना भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी विराट कोहलीचे कौतुक केले. त्यानंतर चाहत्यांचा पारा चांगलाच चढलेला पाहायला मिळाला. त्यानंतर चाहत्यांनी शास्त्री यांना चांगलेच ट्रोल केल्याचे पाहायला मिळाले. शास्त्री यांनी एक पुस्तक लिहिले आहे. या पुस्तकामध्ये भारताला गेल्या ७१ वर्षांत मोठा विजय मिळवता आला नव्हता आणि कोहलीने तो मिळवून दिला, असे म्हटले आहे. यावेळी शास्त्री म्हणाले की, " गेल्या ७१ वर्षांत भारताला ऑस्ट्रेलियामध्ये मोठा विजय मिळवता आला नव्हता. पण कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने ऑस्ट्रेलियामध्ये मालिका विजय मिळवला होता. कोणत्याही भारतीय कर्णधाराला ही गोष्ट मिळवणे कठिण आहे." कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला यंदाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात मानहानीकारक पराभव पत्करावा लागला होता. पहिल्या कसोटी सामन्यात कोहलीने भारताचे नेतृत्व केले होते आणि भारताच्या पदरी लाजीरवाणा पराभव पडला होता. त्यानंतर अजिंक्यच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने दुसऱ्या कसोटी सामन्यात विजय मिळवला होता. त्यानंतर शास्त्री यांनी जे विधान केले त्यावर चाहते चांगलेच भडकलेले पाहायला मिळाले. भारताविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यातील पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाने २ बाद १६६ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टिम पेन याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णय योग्य ठरवत त्यांनी पहिल्या दिवसावर वर्चस्व राखले. ऑस्ट्रेलियाकडून पदार्पण करणाऱ्या आणि मार्नस लाबुशेन यांनी अर्धशतकी खेळी केली. पुकोव्हस्कीने पदार्पणातच अर्धशतक झळकावले. त्याला ऋषभ पंतने दोन वेळा जीवनदान दिले. अखेर भारताकडून पदार्पण करणाऱ्या ऑस्ट्रेलियाकडून पदार्पण करणाऱ्या पुकोव्हस्कीची विकेट घेतली. त्याने ११० चेंडूत ४ चौकारांसह ६२ धावा केल्या. त्यानंतर आलेल्या स्टीव्ह स्मिथ याने लाबुशेनसोबत तिसऱ्या विकेटसाठी नाबाद ६६ धावांची भागिदारी केली. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा ऑस्ट्रेलियाने २ बाद १६६ धावा केल्या. लाबुशाने ६७ धावांवर तर स्मिथ ३१ धावांवर नाबाद खेळत होते. भारताकडून सिराज आणि सैनी यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3s4Qfmg
No comments:
Post a Comment