
सिडनी: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सिडनी क्रिकेट मैदानावर तिसरा कसोटी सामना सुरू आहे. चार सामन्यांच्या मालिकेत दोन्ही संघ १-१ अशा स्थितीत आहेत. त्यामुळे तिसरा कसोटी सामना दोघांसाठी महत्त्वाचा आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने संघात दोन बदल केले. आणि यांना संघात स्थान दिले. वाचा- वॉर्नर आणि पुकोव्हस्की यांनी ऑस्ट्रेलियाच्या डावाची सुरूवात केली. ऑस्ट्रेलियाने ३५ वर्षानंतर एकाच मालिकेत चार सलामीवीर बदलले. भारताविरुद्धच्या पहिल्या दोन लढतीत मॅथ्यू वेड आणि जो बर्न्स यांनी डावाची सुरूवात केली होती. आता तिसऱ्या लढतीत वॉर्नर आणि पुकोव्हस्की हे दोघे सलामीवीर म्हणून उतरले. दुखापतीतून सावरलेल्या वॉर्नर सलामीला आला पण त्याला मोठी धावसंख्या करता आली नाही. तो फक्त ५ धावा करून बाद झाला. तर पहिलीच कसोटी खेळणाऱ्या पुकोव्हस्कीने अर्धशतक झळकावले. वाचा- भारताविरुद्धच्या मालिकेआधी ऑस्ट्रेलियाने १९८५-८६ साली न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत चार सलामीवीर खेळवले होते. तेव्हा पर्थ कसोटीत एड्यू हिल्डिच आणि कॅपलर वेसेल्स यांनी तर सिडनी कसोटीत रोबी केर आणि वेन फिलिप्स यांनी डावाची सुरूवात केली होती. वाचा- एडिलेड येथे झालेल्या पहिल्या कसोटीतील पराभवानंतर भारताने दुसऱ्या सामन्यात विजय मिळवून मालिकेत बरोबरी साधली.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/398BlDa
No comments:
Post a Comment