
सिडनी: भारताविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात ()च्या शानदार शतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ३३८ धावा केल्या. भारताकडून () ने सर्वाधिक चार विकेट घेतल्या. वाचा- सिडनी कसोटीच्या दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाने कालच्या २ बाद १६६ धावसंख्येवरून पुढे खेळण्यास सुरूवात केली. मार्नस लाबुशेन आणि स्टीव्ह स्मिथ यांनी शतकी भागिदारी केली. लाबुशेन शतकाच्या जवळ पोहोचला असता रविंद्र जडेजाने त्याला ९१ धावांवर बाद केले. कर्णधार अजिंक्य रहाणे स्लिपमध्ये त्याचा शानदार कॅच घेतला. त्यानंतर आलेल्या मॅथ्यू वेड वेगवान धावा करण्याचा प्रयत्नात १३ धावांवर बाद झाला. त्याला जडेजाने बाद केले. दरम्यान स्मिथने अर्धशतक पूर्ण केले. वाचा- पहिले सत्र संपण्याआधी बुमराहने कॅमरून ग्रीनला शून्यावर माघारी पाठवले. दुसऱ्या सत्राच्या सुरुवातीलाच बुमराहने ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेनची बोल्ड काढली. त्या पाठोपाठ जडेजाने पॅट कमिन्सला शून्यावर बाद केले. पदार्पण करणाऱ्या सैनीने मिचेल स्टार्कला २४ धावांवर बाद केले. तर जडेजाने नॅथन लायनला शून्यावर बाद केले. या दरम्यान स्मिथने कसोटीतील २७वे शतक झळकावले आणि ऑस्ट्रेलियाने देखील ३०० धावांचा टप्पा पार केला. वाचा- ऑस्ट्रेलियाचा डाव संपुष्ठात येण्याआधी स्मिथने धावांचा वेग वाढवला. एक चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात त्याला जडेजाने धावाबाद केले. स्मिथने २२६ चेंडूत १६ चौकारांसह १३१ धावा केल्या. वाचा- भारताकडून जडेजाने सर्वाधिक चार विकेट घेतल्या. बुमराह आणि नवदीप सैनीने प्रत्येकी २ तर मोहम्मद सिराजे एक विकेट घेतली.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/39aOY4B
No comments:
Post a Comment