![](https://maharashtratimes.com/photo/80338692/photo-80338692.jpg)
ब्रिस्बेन: भारतीय संघातील स्टार सलामीवीर () हा जसा उत्तम फलंदाज आहे तसाच तो उत्तम फिल्डर म्हणून देखील ओळखला जातो. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यात रोहित शर्मा दुसऱ्या डावात ७ धावा करून बाद झाला. भारताला अखेरच्या दिवशी विजसाठी ३२४ धावा करायच्या आहेत. रोहित लवकर बाद झाला असला तरी काल भारताची गोलंदाजी सुरू असताना त्याने एक विक्रम केला आहे. वाचा- चौथ्या कसोटीत भारताने ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव २९४ धावांवर संपुष्ठात आणला. रोहितने दोन्ही डावात मिळून पाच कॅच पडकले. गाबा मैदानावर एका सामन्यात सर्वाधिक कॅच पकडण्याबाबतच्या विक्रमात तो आता संयुक्तपणे दुसऱ्या स्थानावर आहे. वाचा- ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात रोहितने स्पिमध्ये शार्दुल ठाकूरच्या गोलंदाजीवर कॅमरून ग्रीनचा कॅच पकडला. हा त्याचा सामन्यातील पाचवा कॅच ठरला. ब्रिस्बेन येथे एका कसोटी सर्वाधिक कॅच पकडण्याचा विक्रम न्यूझीलंडचा माजी कर्णधार स्टीफन फ्लेमिंगच्या नावावर आहे. त्याने १९९७ साली सहा कॅच पकडले होते. ऑस्ट्रेलियाच्या सॅम लॉक्सटन आणि मार्क टेलर यांनी देखील प्रत्येकी ५ कॅच पकडले आहेत. १९५० साली इंग्लंडविरुद्ध लॉक्सटन यांनी पाच तर टेलरने १९९७ साली न्यूझीलंडविरुद्ध अशी कामगिरी केली होती.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3qreCZQ
No comments:
Post a Comment