![](https://maharashtratimes.com/photo/80338370/photo-80338370.jpg)
नवी दिल्ली: ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर पुढील फेब्रुवारी महिन्यात इंग्लंडचा संघ भारताच्या दौऱ्यावर () येत आहे. या दौऱ्याची सुरूवात चार सामन्यांच्या कसोटी मालिकेने होणार असून त्यासाठी संघाची निवड आज (मंगळवारी) केली जाणार आहे. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी विराट कोहली () पुन्हा संघात येईल. त्याने पहिल्या बाळाच्या जन्मासाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून सुट्टी घेतली होती. तर जलद गोलंदाज इशांत शर्मा () देखील पुन्हा संघात येऊ शकतो. दुखापतीमुळे तो बराच काळ संघातून बाहेर राहिला आहे. इशांतला दुखापतीमुळे आयपीएलचा १३वा हंगाम आणि संपूर्ण ऑस्ट्रेलिया दौऱ्यात खेळता आले नाही. आता तो कमबॅकसाठी सज्ज झाला आहे. वाचा- इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटीसाठी आज भारतीय संघ निवडला जाईल. सध्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरू असलेल्या ब्रिस्बेन कसोटीत दुखापतीमुळे न खेळणारे जसप्रीत बुमराह आणि आर अश्विन यांना संघात घेतले जाईल का याकडे सर्वांचे लक्ष असेल. पाच फेब्रुवारीपासून इंग्लंड विरुद्ध कसोटी मालिका सुरू होत आहे. त्यामुळे या दोघांना विश्रांतीसाठी पुरेसा कालावधी मिळू मिळणार आहे. म्हणून हे दोन्ही खेळाडू संघात दिसतील अशी अपेक्षा आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेदरम्यान दुखापत झाल्याने संघाबाहेर झालेले मोहम्मद शमी, रविंद्र जडेजा, उमेश यादव आणि हनुमा विहारी हे खेळाडू निवडीसाठी उपलब्ध नसतील. चेतन शर्मा यांच्या अध्यक्षतेखालील निवड समिती ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील फिट खेळाडूंना संघात कायम ठेवतील. त्यामुळे भारतीय संघात नवा चेहरा दिसण्याची शक्यता कमीच आहे. वाचा- पहिल्या कसोटीसाठी भारतीय संघातील खेळाडू २७ जानेवारीपासून बायो बाबलमध्ये प्रवेश करतील. पहिले दोन्ही कसोटी सामने चेन्नईत होणार आहेत. यातील पहिला सामना ५ ते ९ फेब्रुवारी तर दुसरा १३ ते १७ फेब्रुवारी या दरम्यान होईल. दुखापतीतून बाहेर आलेला इशांत शर्मा सय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धेत खेळत आहे. त्याने आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे इंग्लंड दौऱ्यात त्याच्यासह जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज हे जलद गोलंदाज असतील. तर शार्दुल ठाकूर आणि टी नटराजन बॅकअप गोलंदाज असतील.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/35VetGf
No comments:
Post a Comment