सिडनी, : भारतीय संघाला तिसऱ्या कसोटी सामन्यातही मोठा धक्का बसला आहे. भारताचा यष्टीरक्षक रिषभ पंतला दुखापत झाली असून ती गंभीर स्वरुपाची आहे. त्यामुळे वैद्यकीय चाचणी करण्यासाठी पंतला आता हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले आहे, अशी माहिती बीसीसीआयने दिली आहे. आजच्या तिसऱ्या दिवशी भारताचा कर्णधार अजिंक्य रहाणे आणि त्यानंतर हनुमा विहारी यांना मोठी खेळी साकारता आली नाही. पण त्यानंतर मात्र चेतेश्वर पुजारा आणि रिषभ पंत यांच्यामध्ये चांगली भागीदारी होत होती. ही भागीदारी फोडण्यासाठी ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी बाऊन्सर्सचा वापर केला. यामधील एक बाऊन्सर पंतच्या डाव्या हाताच्या कोपराला लागला. ही दुखापत गंभीर स्वरुपाची असून आता त्याला तिसऱ्या दिवशी तरी खेळता येणार नाही, असे दिसत आहे. तिसऱ्या दिवशी फलंदाजी करत असताना भारताचा दुसरा डाव २४४ धावांवर संपुष्टात आला आणि ऑस्ट्रेलियाने आघाडी घेतली. भारताकडून पहिल्या डावात चेतेश्वर पुजारा आणि शुभमन गिल यांनाच अर्धशतक झळकावता आले. अन्य खेळाडूंना मोठी खेळी साकारता न आल्यामुळेच भारतीय संघाला पहिल्या डावानंतर आघाडी घेता आली नाही. भारताचे तीन फलंदाज यावेळी धावचीत झाले आणि याचा मोठा फटका संघाला बसला. भारताचा अर्धशतकवीर सलामीवीर शुभमन गिल यावेळी ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूवर चांगलाच भडकलेला पाहायला मिळाला. गिलचा पारा एवढा चढला होता की, मॅच संपल्यावर तु मला भेट, असे म्हणायलाही गिल कचरला नाही. नेमकं घडलं तरी काय...गिल आणि रोहित शर्मा यांनी भारताच्या डावाची चांगली सुरुवात केली होती. हे ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना पाहवत नव्हते आणि त्यामुळेच त्यांनी स्लेजिंग करायला सुरुवात केली. ऑस्ट्रेलियाचा खेळाडू मार्नल लाबुशेनने यावेळी रोहित शर्माबरोबरही स्लेजिंग केली. लाबुशेनने रोहितला विचारले की, तुझा क्वारंटाइनचा कखडतर काळ नेमका कसा होता? या प्रश्नावर रोहितने लाबुशेनला कोणतेच उत्तर दिले नाही. रोहितने यावेळी आपल्या बॅटनेच ऑस्ट्रेलियाच्या संघाला उत्तर देत होता. लाबुशेनने यावेळी गिलबरोबरही स्लेजिंग करण्याचा प्रयत्न केला. लाबुशेन गिलला म्हणाला की, " तुझा आवडता खेळाडू कोण आहे, सचिन तेंडुलकर की विराट कोहली?" पहिल्यांदा या प्रश्नावर गिलने लाबुशेनला कोणतेच उत्तर दिले नाही. पण लाबुशेन सातत्याने गिलला त्रास देत होता. त्यानंतर लाबुशेनने गिलला पुन्हा एकदा विचारले की, " तुझा आवडता खेळाडू सचिन आहे की विराट, तुमच्या संघाला यावेळी विराटची सर्वात जास्त आठवण येत असेल ना?" यानंतर मात्र गिलने आपले मौन सोडले. गिल लाबुशेनला म्हणाला की, " सामना संपल्यावर मला भेट, तुला तुझ्या सर्व प्रश्नांची उत्तरं मी देतो."
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3osnYnK
No comments:
Post a Comment