
सिडनी: AUS v IND 3rd Test day 1st भारताविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यातील पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाने २ बाद १६६ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टिम पेन याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णय योग्य ठरवत त्यांनी पहिल्या दिवसावर वर्चस्व राखले. ऑस्ट्रेलियाकडून पदार्पण करणाऱ्या आणि मार्नस लाबुशेन यांनी अर्धशतकी खेळी केली. वाचा- तिसऱ्या कसोटीसाठी दोन्ही संघात प्रत्येकी दोन बदल करण्यात आले होते. भारतीय संघात रोहित शर्मा आणि नवदीप सैनी तर ऑस्ट्रेलिया संघात डेव्हिड वॉर्नर आणि विलो पुकोव्हस्की यांचा समावेश करण्यात आला. ऑस्ट्रेलियाच्या डावाची सुरूवात वॉर्नर आणि पुकोव्हस्की यांनी केली. चौथ्याच ओव्हरमध्ये भारताच्या मोहम्मद सिराज याने डेव्हिड वॉर्नरला ५ धावांवर बाद करत ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का दिला. पण त्यानंतर पावसाच्या व्यत्ययामुळे सामना थांबवण्यात आला. पहिल्या सत्रातील बराच खेळ पावसामुळे वाया गेला. त्यानंतर पुकोव्हस्की आणि मार्नस लाबुशेन यांनी दुसऱ्या विकेटसाठी शतकी भागिदारी केली. वाचा- पुकोव्हस्कीने पदार्पणातच अर्धशतक झळकावले. त्याला ऋषभ पंतने दोन वेळा जीवनदान दिले. अखेर भारताकडून पदार्पण करणाऱ्या ऑस्ट्रेलियाकडून पदार्पण करणाऱ्या पुकोव्हस्कीची विकेट घेतली. त्याने ११० चेंडूत ४ चौकारांसह ६२ धावा केल्या. त्यानंतर आलेल्या स्टीव्ह स्मिथ याने लाबुशेनसोबत तिसऱ्या विकेटसाठी नाबाद ६६ धावांची भागिदारी केली. वाचा- पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा ऑस्ट्रेलियाने २ बाद १६६ धावा केल्या. लाबुशाने ६७ धावांवर तर स्मिथ ३१ धावांवर नाबाद खेळत होते. भारताकडून सिराज आणि सैनी यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3s13HI2
No comments:
Post a Comment