
सिडनी, : तिसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाला मोठा फटका बसल्याचे पाहायला मिळाले. भारताचा यष्टीरक्षक रिषभ पंतने यावेळी दोन झेल सोडले आणि या गोष्टीचा मोठा फटका भारताला पहिल्या दिवशी बसल्याचे पाहायला मिळाले. ऑस्ट्रेलिया युवा सलामीवीर विल पुकोव्हस्कीने या सामन्यात अर्धशतकी खेळी साकारली. पण पुकोव्हस्कीला लवकर बाद करण्याची संधी भारतीय संघाकडे चालून आली होती. पण यावेळी पंतने पुकोव्हस्कीचे दोन झेल सोडले आणि या जीवदानांचा फायदा त्याने चांगलाच उठवल्याचे पाहायला मिळाले. पुकोव्हस्कीचा एक सोपा झेल पंतने आर. अश्विनच्या गोलंदाजीवर सोडला. त्यावेळी पुकोव्हस्की हा २६ धावांवर फलंदाजी करत होता. पुकोव्हस्कीला मिळालेले हे पहिले जीवदान होते. त्यानंतरच्या पुढच्याच षटकात मोहम्मद सिराजच्या गोलंदाजीवर पंतने पुन्हा एकदा एक झेल सोडला. या दोन जीवदानांचा चांगलाच फायदा यावेळी पुकोव्हस्कीला मिळालाय त्याचबरोबर २९ व्या षटकात पुकोव्हस्कीला धावचीत करण्याची संधी भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराकडेही होती. पण यावेळी बुमराचा पाय घसरला आणि पुकोव्हस्कीला तिसऱ्यांदा जीवदान मिळाल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर पुकोव्हस्कीने अर्धशतक झळकावले. त्याचबरोबर या मैदानात पदार्पणात अर्धशतक झळकावणारा पुकोव्हस्की हा ऑस्ट्रेलियाचा सर्वात युवा खेळाडू ठरला. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा कसोटी सामना सिडनी क्रिकेट मैदानावर सुरू आहे. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेन याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताचा जलद गोलंदाज मोहम्मद सिराज (mohammed siraj)ने चौथ्याच ओव्हरमध्ये मोठी विकेट घेतली. त्याने डेव्हिड वॉर्नरला ५ धावांवर बाद केले. पण आठव्या ओव्हरमध्ये पावसाला सुरूवात झाली आणि खेळ थांबवण्यात आला. जलद गोलंदाज मोहम्मद सिराजला दुसऱ्या कसोटी सामन्यात पदार्पणाची संधी मिळाली. त्याने पहिल्याच सामन्यात चमकदार कामगिरी केली. दुसऱ्या कसोटीत देखील त्याने वॉर्नरची विकेट घेतली. पण त्याआधी सामना सुरू होण्याआधी जेव्हा सिडनी मैदानावर जेव्हा भारताचे राष्ट्रगीत सुरू झाले तेव्हा सिराजच्या डोळ्यातून आश्रू आले.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3bi3t9A
No comments:
Post a Comment