नवी दिल्ली: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू मर्यादीत षटकांची मालिका संपली आहे. वनडे मालिकेत ऑस्ट्रेलियाने तर भारताने टी-२० मालिकेत बाजी मारली. ऑस्ट्रेलियाने वनडेत २-१ तर भारताने देखील टी-२० मध्ये २-१ असा विजय मिळवला. आता दोन्ही संघात १७ डिसेंबरपासून चार सामन्यांची कसोटी मालिका सुरू होणार आहे. वाचा- या कसोटी मालिकेआधी भारत अ आणि ऑस्ट्रेलिया अ यांच्यात सराव सामना झाला. ही लढत ड्रॉ झाली. या सामन्यात एक अनपेक्षित घटना घडली ज्यामुळे सर्वांच्या काळजाचा ठोका चुकला. वाचा- ऑस्ट्रेलियाचा डाव सुरू असताना भारताचा जलद गोलंदाज कार्तिक त्यागीने एक बाउसर चेंडू टाकला. हा चेंडू ऑस्ट्रेलियाचा फलंदाज विल पुकोवस्कीच्या हेल्मेटला लागला आणि तो जमिनीवर कोसळला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. वाचा- ऑस्ट्रेलिया अ संघाकडून सलामीला आलेल्या विल पुकोवस्की कार्तिक त्यागीच्या चेंडूवर जखमी झाला. यामुळे भारत ए विरुद्धच्या दुसऱ्या सराव सामन्याला तो आता मुकणार आहे. हा दुसरा सरवा सामना ११ डिसेंबरपासून सुरू होणार आहे. डेव्हिड वॉर्नर जखमी झाल्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या मुख्य संघात पुकोवस्कीला संधी मिळेल असे बोलले जात होते. पण सराव सामन्यातील दुखापतीमुळे तो खेळेल की नाही याबद्दल शंका आहे. वाचा- कार्तिक त्यागीने टाकलेला बाउसर चेंडू टाकल्यावर विल पुकोवस्की खाली झुकला, तरी चेंडू त्याच्या हेल्मेटला लागला आणि तो खाली कोसळला. काही वेळात तो बरा झाला पण पुढे खेळू शकला नाही. विलने मैदान सोडले. त्याने पहिल्या डावात १ धाव तर दुसऱ्या डावात २३ धावा केल्या. वाचा- सराव सामन्यात भारत अ ने पहिल्या डावात ९ बाद २४७ धावा केल्या. भारताकडून अजिंक्य रहाणेने नाबाद ११७ धावा केल्या. ऑस्ट्रेलिया अ ने पहिला डाव ९ बाद ३०६ वर घोषित केला. त्यांच्याकडून ग्रीनने नाबाद १२५ धावा केल्या. दुसऱ्या डावात भारताने १८९ वर डाव घोषीत केला. ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात एक बाद ५२ धावा केल्या.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2JNzkU9
No comments:
Post a Comment