दुबई: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील टी-२० मालिका झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने टी-२० मधील क्रमवारी जाहीर केली आहे. या क्रमवारीत भारताच्या खेळाडूंना फायदा झालाय. वाचा- आयसीसीने जाहीर केलेल्या ताज्या क्रमवारीत भारतीय संघाचा कर्णधार आणि विकेटकीपर लोकेश राहुल यांच्या क्रमवारीत सुधारणा झाली आहे. फलंदाजांच्या क्रमवारीत तिसऱ्या तर विराट कोहली आठव्या स्थानावर आहे. वाचा- ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-२० मालिकेत भारताने २-१ असा विजय मिळवला. आयसीसीच्या टी-२० क्रमवारीत फलंदाजांच्या यादीत दोन भारतीय खेळाडू आहेत. इंग्लंडचा डेव्हिड मलान ९१५ गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. पाकिस्तानचा बाबर आजम ८७१ गुणांसह दुसऱ्या, तर केएल राहुल ८१६ गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार एरॉन फिंच आणि अष्ठपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेल यांचे स्थान घसरले आहे. फिंच चौथ्या तर मॅक्सवेल सातव्या स्थानावर आहे. वाचा- वाचा- गोलंदाजांच्या क्रमवारीत एडम जम्पा पहिल्या पाच मध्ये पोहोचला आहे. ख्रिस जॉर्डनने पहिल्या १० मध्ये जागा मिळवली आहे. आदिल राशिद तिसऱ्या, पाकिस्तानचा इमाद वासीम आठव्या तर वेस्ट इंडिजचा शेल्डन कॉटरेल नवव्या स्थानावर आहे. या तिघांच्या क्रमवारीत वाढ झाली आहे. अफगाणिस्तानचा राशिद खान पहिल्या तर मुजीब उर रहमान दुसऱ्या स्थानावर आहे. वाचा-
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/37U3v4e
No comments:
Post a Comment