सिडनी: ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या वनडे आणि टी-२० मालिकेनंतर आता कसोटी मालिकेला सुरूवात होणार आहे. १७ डिसेंबर रोजी एडिलेड येथे पहिली कसोटी होईल. या कसोटी मालिकेआधी भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया अ विरुद्ध सराव सामना खेळला. ही डे-नाइट लढत ड्रॉ झाली. वाचा- भारतीय संघाने या लढतीत सलामीवीर म्हणून ( )ला संधी दिली. पण फलंदाजीत दोन्ही डावात तो अपयशी ठरला. भारतीय संघाचे नेतृत्व करणाऱ्या अजिंक्य रहाणेने या सामन्यात पृथ्वीकडून गोलंदाजी करून घेतली. पृथ्वीने त्याच्या गोलंदाजीने सर्वांना हैराण केले. त्याच्या या गोलंदाजीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. वाचा- पृथ्वी शॉ हा पार्ट टाइम ऑफ ब्रेक गोलंदाज आहे. सराव सामन्याच्या अखेरच्या दिवशी पृथ्वीने गोलंदाजी केली. त्याने तीन षटके टाकली त्यात एक फिरकी चेंडू असा टाकला की ज्यामुळे फक्त फलंदाज नाही तर भारतीय संघातील खेळाडू हैराण झाले. ज्या प्रमाणे ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फिरकीपटू शेन वॉर्न चेंडू टाकायचा त्याच पद्धतीने पृथ्वीने हा चेंडू टाकला. त्याला या चांगल्या चेंडूवर विकेट मिळाली नाही. त्याने ३ षटकात २६ धावा दिल्या. पण हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. वाचा- वाचा- पृथ्वी सध्या खराब फॉर्ममध्ये आहे. आयपीएलच्या १३ सामन्यात त्याने फक्त २२८ धावा केल्या. दिल्ली संघाने देखील त्याला काही सामन्यातून वगळले होते. ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील सराव सामन्यात त्याला धावा करता आल्या नाहीत. चार डावात मिळून त्याने फक्त ६२ धावा केल्या. यातील ४० धावा एकाच डावातील आहेत. खराब फॉर्ममध्ये असलेल्या पृथ्वीला भारतीय संघात स्थान मिळण्याची शक्यता नाही. पृथ्वीच्या जागी शुभमन गिलला संधी मिळू शकते. रोहितच्या गैरहजेरीत तो मयांक अग्रवाल सोबत सलामीला येऊ शकतो.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3ml8r7g
No comments:
Post a Comment