नवी दिल्ली: भारताला २८ वर्षानंतर वर्ल्डकप जिंकून देण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडणारा पुन्हा एकदा मैदानावर परतणार आहे. १० जानेवारीपासून सुरू होणाऱ्या () स्पर्धेत युवराज सिंग () खेळण्याची शक्यता आहे. पंजाबने ३० खेळाडूंच्या संभाव्य यादीत युवराजचा समावेश केला आहे. वाचा- युवीने २०१९ साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. पण आता त्याला पुन्हा क्रिकेट खेळायचे आहे. युवराजने पंजाबकडून पुन्हा देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळण्याची इच्छा व्यक्त केली होती. सैयद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेसाठी सर्व खेळाडूंचा १८ डिसेंबर रोजी सराव सत्र घेतले जाणार आहे. काही दिवसांपूर्वी युवराजने इस्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला होता. या व्हिडिओत तो पूर्वी प्रमाणेच धमाकेदार फलंदाजी करताना दिसत आहे. वाचा- आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर युवराज कॅनडामधील ग्लोबल टी-२० लीग स्पर्धेत खेळला होता. युवीने निवृत्ती घेताना आयपीएल टी-२० स्पर्धा खेळणार नसल्याचे म्हटले होते. वाचा- वाचा- क्रिकेट असोसिएशनचे सचिव पुनीत बाली यांनी युवराजला निवृत्ती मागे घेण्याची विनंती केली होती. जेणेकरून तो युवा खेळाडूंना मार्गदर्शन करू शकेल. बाली यांची विनंती मान्य करत युवराजने बीसीसीआय आणि अध्यक्ष सौरव गांगुली यांना पत्र लिहून देशांतर्गत क्रिकेट खेळण्याची परवानगी देण्याची विनंती केली होती. त्यानंतर बीसीसीआयने त्याची विनंती मान्य केली. वाचा-
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3aaC5tl
No comments:
Post a Comment