नवी दिल्ली: अंपायरच्या निर्णयामुळे क्रिकेट मैदानावर अनेक वाद झाले आहेत. पण सध्या क्रिकेटमध्ये तिसऱ्या अंपायरने दिलेल्या निर्णयामुळे वाद सुरू झाला आहे. मैदानावरील अंपायरचे निर्णय चुकतात म्हणूनच तिसऱ्या पंचाची किंवा DRSची मदत घेतली जाते, मात्र येथे तिसऱ्या पंच्याच्या निर्णयावरू वाद झालाय. न्यूझीलंड आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिला कसोटी सामना हेलिल्टन येथे झाला. या सामन्यात न्यूझीलंडने वेस्ट इंडिजचा एक डाव आणि १३४ धावांनी पराभव केला. या सामन्यात अशी एक घटना झाली ज्यामुळे सर्व जण हैराण झाले. वाचा- वेस्ट इंडिजचा फलंदाज जॉन कॅपबेलला अंपायरने बाद दिले आणि वाद सुरू झाला. सलामीवीर कॅपबेले मारलेल्या शॉटवर चेंडू थेट स्लिपमध्ये गेला आणि फिल्डर टॉम लॅथमने तो पकडला. पण लॅथमने कॅच निट पकडला की नाही याबद्दल शंका होती. मैदानावरील अंपायरने तिसऱ्या अंपायरची मदत मागितली. तिसऱ्या अंपायरने बराच वेळ घेतल्यानंतर कॅपबेलला बाद दिले. पण तो खरच बाद होता का यावरून वाद सुरू आहे. वाचा- कसोटी सामन्यात वेस्ट इंडिजच्या दुसऱ्या डावात ही घटना घडली. दुसऱ्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर ट्रेंट बोल्टने कॅपबेलची विकेट घेतली. कॅपबेलने बोल्टचा चेंडू मारण्याचा प्रयत्न केला. पण तो स्लिपमध्ये उभ्या असलेल्या लॅथमच्या जवळ गेला. त्याने पुढच्या बाजूला दोन्ही हाताने कॅच पकडण्याचा प्रयत्न केला. पण चेंडू निट पकडला की नाही याबाबत अद्याप शंका आहे. वाचा- मैदानावरील अंपायर ख्रिस गफ्नेय आणि वेन नाइट्स यांनी कॅपबेलला बाद दिले, पण अंतिम निर्णय तिसऱ्या अंपायरकडे सोपवला. रिप्लेमध्ये लॅथमच्या हातात जाण्याआधी चेंडूचा जमीनीवर स्पर्ष झाला हे स्पष्ट होत नव्हते. अखेर टीव्ही अंपायर ख्रिस ब्राऊन यांनी मैदानावरील अंपायरचा निर्णय कायम ठेवला आणि कॅपबेलला आउट दिले. न्यूझीलंडने पहिला कसोटी सामना चौथ्या दिवशीच जिंकला. आता त्यांचा मुकाबला पाकिस्तानविरुद्ध होणार आहे. या मालिकेत न्यूझीलंडने विजय मिळवला आणि भारत विरुद्ध ऑस्टेलिया यांच्यातील मालिकेचा निर्णय न्यूझीलंडला हवा तसा लागला तर कसोटी क्रमवारीत ते पहिल्या दोन मध्ये जागा मिळवू शकतील. न्यूझीलंडने वेस्ट इंडिजविरुद्धची मालिका २-० अशी जिंकली तर ते आयसीसी टेस्ट चॅम्पियनशिपच्या क्रमवारीत इंग्लंडला मागे टाकत तिसऱ्या स्थानावर पोहोचू शकतात.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3qM5wrs
No comments:
Post a Comment