Ads

Thursday, December 10, 2020

करोनानंतर भारतात होणार पहिली आंतरराष्ट्रीय मॅच; BCCIने जाहीर केला कार्यक्रम

नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने पुढील वर्षी होणाऱ्या इंग्लंडच्या भारत दौऱ्याचा कार्यक्रम आणि वेळापत्रक जाहीर केले आहे. इंग्लंडचा संघ चार कसोटी, पाच टी-२० आणि तीन वनडे सामन्यांची मालिका खेळणार आहे. वाचा- भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर आहे. त्यानंतर टीम इंडिया मायदेशात इंग्लंड विरुद्ध टी-२०, कसोटी आणि वनडे मालिका खेळणार आहे. इंग्लंडच्या भारत दौऱ्याची सुरूवात चार सामन्यांच्या कसोटी मालिकेने होणार आहे. पहिला कसोटी सामना ५ ते ९ फेब्रुवारी रोजी चेन्नईत, दुसरा कसोटी सामना १३ ते १७ फेब्रुवारी दरम्यान चेन्नईत, तिसरा कसोटी सामना २४ ते २८ फेब्रुवारी दरम्यान अहमदाबाद येथे होणार आहे. तिसरी कसोटी टे-नाईट असेल. जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट मैदानावर ही डे-नाईट लढत होईल. भारतातील ही दुसरी डे-नाईट लढत असेल. याआधी बीसीसीआयने गेल्या वर्षी कोलकाता येथे पहिल्या डे-नाईट सामन्याचे आयोजन केले होते. चौथा आणि अखेरचा कसोटी सामना ४ ते ८ मार्च दरम्यान अहमदाबाद येथेच होईल. वाचा- कसोटी मालिकेचे वेळापत्रक पहिली कसोटी, चेन्नई- ५ ते ९ फेब्रुवारी दुसरी कसोटी, चेन्नई- १३ ते १७ फेब्रुवारी तिसरी कसोटी, अहमदाबाद- २४ ते २८ फेब्रुवारी (डे-नाईट) चौथी कसोटी, अहमदाबाद- ४ ते ८ मार्च वाचा- कसोटी मालिकेनंतर पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेला सुरूवात होईल. या सर्व लढती अहमदाबाद येथेच होतील. वाचा- टी-२० मालिकेचे वेळापत्रक पहिली मॅच- १२ मार्च दुसरी मॅच- १४ मार्च तिसरी मॅच- १६ मार्च चौथी मॅच- १८ मार्च पाचवी मॅच- २० मार्च इंग्लंड दौऱ्याची अखेर तीन सामन्यांच्या वनडे मालिकेने होणार आहे. टी-२० प्रमाणेच वनडे मालिका एकाच ठिकाणी होईल. या सर्व लढती पुण्यात होणार आहेत. वाचा- वनडे सामन्यांचे वेळापत्रक पहिली वनडे- २३ मार्च दुसरी वनडे- २६ मार्च तिसरी वनडे- २८ मार्च


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3qRsZrF

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...