Ads

Thursday, December 10, 2020

Explainer: भारत तयार करत आहे टी-२० वर्ल्डकपसाठीचा संघ; या खेळाडूंना मिळेल संधी

नवी दिल्ली: पुढील वर्षी होणाऱ्या टी-२० वर्ल्डकपच्या दृष्टीने भारतीय संघाने तयारी सुरू केली आहे. आयसीसी पुढील वर्षी ऑक्टोबरमध्ये होणार आहे. सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघाने टी-२० मालिकेत चांगली कामगिरी केली. भारताने मालिका २-१ अशी जिंकली. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतच भारतीय संघाने वर्ल्डकपच्या दृष्टीने तयारी सुरू केली आहे. पुढील वर्षी वर्ल्डकप होणार आहे. तोपर्यंत भारताचा स्टार ओपनर रोहित शर्मा पूर्ण फिट होऊ शकतो. त्यामुळे भारतीय संघ रोहित आणि शिखर धवन या जोडीने पुन्हा एकदा डावाची सुरूवात करू शकतो. केएल राहुलला चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला यावे लागू शकते. पण भारतीय संघात मधळ्या फळीतील अनिश्चितता अद्याप कायम आहे. वाचा- मधळ्याफळीत संजू सॅमसन, मनीष पांडे, श्रेयस अय्यर याचे नाव सर्वात आघाडीवर आहे. सॅमसनला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-२० मालिकेत संधी मिळाली होती. पण त्याचा त्याला फायदा उठवता आला नाही. त्याने शॉर्टची चांगली निवड केली होती, हाच काय तो भारतीय संघासाठी दिलासा ठरणारी गोष्टी आहे. या उटल एडम जम्पाची एक ओव्हर वगळता श्रेयस अय्यरला काहीच प्रभाव टाकता आला नाही. तर मनीष पांडेला संधीच मिळाली नाही. या संघात सूर्यकुमार यादव आणि इशान किशन यांचा समावेश केल्यास कर्णधार विराट कोहलीला अधिक पर्याय मिळू शकतात. मंगळवारी झालेल्या तिसऱ्या टी-२० सामन्यानंतर कोहली मान्य केले की, भारतीय संघाने मधल्या षटकात चांगली फलंदाजी केली नाही. याच बरोबर आता असा देखील एक प्रश्न उपस्थित केला जात आहे की, पुढील वर्षी होणाऱ्या वर्ल्डकप संघात ऋषभ पंतला संघात स्थान मिळेल की नाही. वाचा- हार्दिक पंड्याने एक दमदार फिनिशरच्या रुपाने सहाव्या क्रमांकची जागा फिक्स केली आहे. पण वर्ल्डकप पर्यंत तो चार षटके गोलंदाजी करू शकेल का? हार्दिकने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या वनडेत गोलंदाजी केली होती. त्याच्या गोलंदाजीच्या शैलीत बदल झाला आहे. पण जर तो गोलंदाजी करू लाकला तर भारतीय संघासाठीची मोठी ताकद ठरेल. याच बरोबर घरच्या मैदानावर रविंद्र जडेजाची तुलना कोणासोबत होऊ शकत नाही. सध्याच्या परिस्थितीत भारताकडे जडेजा हा एक अष्ठपैलू म्हणून आहे. यामुळे संघात अन्य खेळाडूला संधी मिळू शकते. त्याच्या फलंदाजीचा फॉम पाहता जडेजा पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करू शकतो आणि हार्दिक पंड्या सहाव्या क्रमांकावर येऊ शकतो. टीम इंडियाकडे सातव्या क्रमांकासाठी आणखी अष्ठपैलू खेळाडूचा पर्याय आहे. जे गोलंदाजीचा सहावा पर्याय म्हणून देखील वापरता येईल आणि आक्रमक फलंदाजी देखील करू शकेल. यासाठी टीम इंडियाच्या व्यवस्थापनापुढे राहुल तेवतिया, क्रुणाल पंड्या, अक्षर पटेल, हर्षल पटेल, विजय शंकर ही नावे आहेत. यातील कोणाला संधी द्यायची हाच खरा प्रश्न असेल. वाचा- वर्ल्डकप स्पर्धेपर्यंत भारत कदाचित शार्दुल ठाकूरला फलंदाजी सुधारण्यास सांगू शकते. ठाकूरने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या टी-२० सामन्यात आक्रमक फलंदाजी केली होती. त्याने फलंदाजीत सुधारणा केली तर संघ व्यवस्थापन त्याला सातव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवू शकते. युजवेंद्र चहलचे घरच्या मैदानावर खेळणे जवळपास फिक्स आहे. जडेजा देखील अंतिम ११ मध्ये असू शकतो. या सोबत जर वॉशिंग्टन सुंदरचा समावेश केला तर टी-२० मधील सर्वात आक्रमक फिरकी भारताकडे असेल. ऑस्ट्रेलियात सुंदरने ७.०८च्या रनरेटने धावा दिल्या. तो फलंदाजी देखील करू शकतो. खराब फिल्डिंग... भारतीय संघात जगातील सर्वोत्तम फिल्डर्स आहेत. पण ऑस्ट्रेलियात असे दिसले नाही. भारतीय संघातील सर्वोत्तम फिल्डर्सनी गजाळ क्षेत्ररक्षण केले. जलद गोलंदाजी जलद गोलंदाजांमध्ये जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी यांची जागा पक्की आहे. आता टी नटराजनने देखील मिळालेल्या संधीचे सोने केले आहे. त्याने ऑस्ट्रेलियात अचूक गोलंदाजी केली. कर्णधार विराट कोहलीने देखील नटराजन टीम इंडियाच्या वर्ल्डकप योजनेचा भाग असेल असे म्हटले आहे. अशात दीपक चाहरचे काय होणार हा प्रश्नच आहे.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3oIuDJV

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...