नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार पुढील वर्षी म्हणजे जानेवारी २०२१ मध्ये बाप होणार आहे. ही गुड न्यूज त्याने सोशल मीडियावरून दिली होती. ट्टिटर इंडिया () ने २०२० सालात सर्वाधिक लाइक्स ( ) मिळालेल्या ट्विटची घोषणा केली आहे. यात विराट कोहलीने शेअर केलेल्या फोटो अव्वल स्थानी आहे. वाचा- करोना व्हायरसमुळे २०२० मध्ये काही खास असे घडले नाही. जगभरातील जवळपास सर्वच देशात लॉकडाउन होता. क्रीडा क्षेत्रात देखील शांतताच होती. आता काही सामने सुरु झाले आहेत. पण भारताचा कर्णधार विराट कोहलीसाठी हे वर्ष चांगले गेले असे म्हणावे लागले. या वर्षी त्याला बाप होणार असल्याची गुड न्यूज मिळाली. ऑगस्ट महिन्यात विराटने सोशल मीडियावरून ही माहिती सर्वांनी दिली होती. वाचा- आता ट्विटर इंडियाने २०२० मधील सर्वात लाइक केलेल्या ट्वीटची घोषणा केली आहे. हे ट्वीट विराट कोहलीने केलेले होते. विराटने शेअर केलेल्या या ट्वीटमध्ये एक फोटो आहे.या फोटोत विराट सोबत देखील आहे. या फोटोत अनुष्काचा बेबी बम्प दिसतोय. अनुष्काच्या मागे विराट उभा आहे. या फोटोला ६ लाखाहून अधिक लाइक्स मिळाले आहेत. हा फोटो शेअर करताना विराटने, आता आम्ही तिघे होणार आहोत. जानेवारी २०२१ मध्ये नवा पाहूणा येतोय. वाचा- वाचा- ... वैयक्तीक आयुष्य सोबत विराटला क्रिकेटच्या मैदानावर बऱ्यापैकी यश मिळाले. श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेनंतर ऑस्ट्रेलियाचा भारतात पराभव केला. त्यानंतर न्यूझीलंड दौऱ्यात वनडे आणि कसोटीत पराभव झाला तरी टी-२० मध्ये ५-० असा विजय मिळवला होता. त्यानंतर आता ऑस्ट्रेलिया दौऱ्यात वनडे मालिका गमावली पण टी-२० मध्ये विजय मिळवला. या वर्षी विराटला आयपीएलचे विजेतेपद मिळवता आले नसले तरी त्याच्या संघाने चांगली कामगिरी केली होती.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3gtEjFj
No comments:
Post a Comment