मुंबई, : भारताचा माजी महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने पहिल्यांदाच रोहित शर्माबाबत आपले वक्तव्य केले आहे. त्याचबरोबर रोहित हा ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर नेमका कधी जाऊ शकतो, याबाबतही सचिनने भाष्य केले आहे. सचिन म्हणाला की, " जेव्हा एखाद्या महत्वाच्या खेळाडूला दुखापत होते, तेव्हा त्याला न खेळवणेच योग्य ठरते. वेस्ट इंडिजच्या दौऱ्यात अनिल कुंबळे हा संघासाठी सर्वात महत्वाचा गोलंदाज होता. पण तो दुखापतग्रस्त असल्यामुळे त्याला आम्ही खेळवले नव्हते. पण जर एखादा खेळाडू पूर्णपणे फिट असेल आणि त्याच्याकडे चांगला अनुभव असेल तर नक्कीच त्याला संधी द्यायला हवी." सचिन पुढे म्हणाला की, " रोहितला दुखापत झाली होती. पण रोहित जर १०० टक्के फिट असेल तर नक्कीच त्याला ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर पाठवायला हवे. रोहित सध्याच्या घडीला पूर्णपणे फिट आहे की नाही, हे रोहित किंवा बीसीसीआय सांगू शकतात. कारण ते एकमेकांच्या संपर्कात आहेत. रोहितची फिटनेस चाचणी झाली आणि त्यामध्ये जर तो पूर्णपणे फिट असेल तर त्याला ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर पाठवण्यात यायला हवे. पण हा निर्णय भारतीय संघ व्यवस्थापन आणि फिजिओ यांचा असेल." रोहितला ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर का पाठवायला हवे, पाहा...ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर रोहितला का पाठवायला हवे, याबाबतही सचिनने आपले मत व्यक्त केले आहे. सचिन म्हणाला की, " भारताचा कर्णधार विराट कोहली हा फक्त पहिला कसोटी सामना खेळणार आहे. त्यानंतर कोहली हा भारतामध्ये येणार आहे. त्यावेळी कोहलीची जागा भारतीय संघाला भरुन काढणाऱ्या अनुभवी खेळाडूची नक्कीच गरज असेल. त्यामुळे रोहित जर फिट असेल आणि त्याने सर्व निकष जर पूर्ण केलेले असतील तर रोहितला नक्कीच ऑस्ट्रेलियाला पाठवायला हवे. रोहित जर दुसऱ्या कसोटी सामन्यापासून भारतीय संघात सहभागी झाला तर ती चांगली गोष्ट असेल. पण रोहितची फिटनेस टेस्ट कधी होते, त्यामध्ये तो पास होतो का आणि पास झाल्यावर संघ व्यवस्थापन नेमका काय निर्णय घेते, यावर सर्व गोष्टी अवलंबून असतील असे मला तरी वाटते."
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3a7OTRx
No comments:
Post a Comment