नवी दिल्ली : भारताचा डावखुरा फलंदाज सुरेश रैना पुढच्यावर्षी आयपीएल खेळणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. या वर्षी रैना चेन्नई सुपर किंग्सच्या संघाला सोडून युएईमधून भारतात दाखल झाला होता. पण आता पुढच्या आयपीएलमध्ये तो खेळणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. सुरेश रैनाने आता क्रिकेटचा जोरदार सराव करायला सुरुवात केली आहे. त्याचबरोबर रैना हा काही दिवसांनी सुरु होणाऱ्या सय्यद मुश्ताक अली ट्वेन्टी-२० स्पर्धेत खेळणार आहे. त्याचबरोबर रैना हा पुढच्या वर्षी आयपीएलमध्ये खेळणार आहे, याबाबतचे वृत्त टाइम्स नाऊ या इंग्रजी संकेतस्थळाने दिले आहे. रैना कोणत्या संघाकडून आयपीएलमध्ये खेळणार? यावर्षी रैना चेन्नई सुपर किंग्सच्या संघाबरोबर युएईमध्ये दाखल झाला होता. पण चेन्नईच्या संघातील १३ सदस्यांना करोनाची लागण झाल्यावर रैनाने संघाला सोडण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी रैना युएईमधून भारतात दाखल झाला होता. त्यावेळी चेन्नईच्या संघाचे मालक आणि बीसीसीआयचे माजी अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांनी रैनाबाबत नाराजी व्यक्त केली होती. त्याचबरोबर रैनाला त्यांनी फटकारलेही होते. त्यामुळे पुढच्या वर्षी रैना चेन्नईच्या संघाडून खेळू शकेल का, हा सर्वात मोठा प्रश्न यावेळी उपस्थित झाला आहे. रैनाचे भवितव्य कसे ठरणार, पाहा...रैनाला जर चेन्नईच्या संघाने कायम ठेवले नाही तर त्याचे भवितव्य हे आयपीएलच्या लिलावात ठरणार आहे. कारण चेन्नईने जर रैनाला आपल्या संघात कायम ठेवण्याचा निर्णय घेतला नाही तर तो लिलावासाठी उपलब्ध होऊ शकेल. रैना हा गेल्या काही वर्षांपासून भारतीय संघाकडून खेळलेला नाही. त्याचबरोबर रैनाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीही जाहीर केली आहे. त्यामुळे गेले काही वर्षे तो स्पर्धात्मक क्रिकेट खेळलेला नाही. त्यामुळे पुढच्या वर्षी होणाऱ्या आयपीएलच्या लिलावात रैनाला कोणता संघ आपल्या ताफ्यात सामील करून घेतो, याची उत्सुकता सर्व क्रिकेट चाहत्यांना नक्कीच असेल. कारण रैनाला आता कोणता संघ किती रुपये मोजू आपल्या संघात स्थान देतो, हे पाहणे सर्वात महत्वाचे ठरणार आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3mW0Pcq
No comments:
Post a Comment