सिडनी: 2nd practice match भारत आणि ऑस्ट्रेलिया अ यांच्यात सुरू असलेल्या दुसऱ्या सराव सामन्यात भारतीय फलंदाजांनी खराब कामगिरी केली म्हणून दिवसभर त्यांच्यावर टीका झाली. जसप्रीत बुमराहने केलेल्या अर्धशतकामुळे भारताने १९४ धावांपर्यंत मजल मारली. पण त्यानंतर गोलंदाजांनी धमाकेदार कामगिरी केली. त्यांनी ऑस्ट्रेलियाला १०८ धावात माघारी पाठले आणि पहिल्या डावात ८६ धावांची आघाडी मिळून दिली. वाचा- दुसऱ्या सराव सामन्यात भारताचा कर्णधार अजिंक्य रहाणेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पृथ्वी शॉ आणि मयांक अग्रवाल यांनी भारतीय डावाची सुरूवात केली खरी. पण मयांक दोन धावा करून माघारी परतला. त्यानंतर आलेल्या शुभमन गिलने पृथ्वी सोबत अर्धशतकी भागिदारी केली. पृथ्वीने कसोटीत टी-२० स्टाइलने फलंदाजी करण्याचा प्रयत्न केला आणि सलग ३ चौकार मारल्यानंतर तो बोल्ड झाला. त्यानंतर हनुमा विराही १५, गिल ४३, कर्णधार रहाणे चार, ऋषभ पंत ५, वृद्धीमान साहा शून्यावर बाद झाले. वाचा- साहा बाद झाला तेव्हा भारताची अवस्था ७ बाद १११ अशी होती. त्यानंतर सैनी चारवर , मोहम्मद शामी शून्यार बाद झाले. अखेरच्या जोडीसाठी जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांनी ७१ धावांची भागिदारी करत भारताची लाज राखली. बुमराह ५५ धावांवर नाबाद राहिला. त्याने ५७ चेंडूत ६ चौकार आणि दोन षटकारांसह ही खेळी केली. सिराज २२ धावांवर बाद झाला. वाचा- ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात बुमराहने दुसऱ्याच षटकात ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का दिला. त्यानंतर आणि यांनी ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना मैदानावर स्थिर होऊ दिले नाही. ऑस्ट्रेलियाकडून कर्णधार एलेक्स कॅरीने सर्वाधिक ३२ धावा केल्या. भारताकडून सैनीने १९ धावा देत ३, शमीने २९ धावा देत ३ विकेट घेतल्या. बुमराहने २ तर मोहम्मद सिराजने एक विकेट घेतली. साहाने घेतला अफलातुन कॅच - वाचा:
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3oI4riF
No comments:
Post a Comment