
कॅनबेरा : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा वनडे सामना उद्या खेळवण्यात येणार आहे. पण या सामन्यापूर्वीच भारताच्या एका गोलंदाजाला गंभीर दुखापत झाली होती. त्यामुळेच त्याला पुन्हा भारतात पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे आता दौरा सोडून हा वेगवान गोलंदाज भारतात परतला आहे. भारतीय संघाबरोबर वेगवान गोलंदाज इशान पोरेल हा ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर गेला होता. पण सराव करताना इशानच्या पायाचे स्नायू दुखावले गेले आहेत. ही दुखापत गंभीर स्वरुपाची असल्यामुळे त्याला थेट भारतात पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. इशान हा भारताच्या संघाबरोबर सराव करत होता, त्यावेळी त्याला ही दुखापत झाली. इशानला भारतीय खेळाडूंना सराव देण्यासाठीच ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर नेण्यात आले होते. बीसीसीआयच्या सूत्रांनी यावेळी सांगितले की, " इशानला भारतीय संघाबरोबर सराव करताना दुखारत झाली होती. त्यामुळे इशानला भारतात बोलण्यात आले आहे. आता इशान राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये गेल्यावर त्याच्या दुखापतीबाबत योग्य तो निर्णय घेतला जाईल आणि तिथेच त्याच्या फिटनेसवर लक्ष देण्यात येईल." भारतीय संघाचा वेगवान गोलंदाजीचा चांगलाच सराव करता यावा, यासाठी इशान, कमलेश नागरकोटी, कार्तिक त्यागी आणि टी. नटराजन यांचा भारतीय संघात समावेश करण्यात आला होता. ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्याला रवाना होण्यापूर्वी कमलेश नागरकोटीने आपले नाव परत घेतले होते. त्यानंतर टी. नटराजनला नवदीप सैनीचा पर्यायी गोलंदाज म्हणून संघात स्थान देण्यात आले होते. आता इशान दुखापतग्रस्त झाला असून तो भारतामध्ये परतला आहे. त्यामुळे आता भारतीय संघाला सराव देण्यासाठी कार्तिक त्यागी हा एकमेव गोलंदाज सध्या भारतीय संघात आहे. ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाताना इशानने आपला एक फोटो ट्विटरवर पोस्ट केला होता. या फोटोमध्ये इशानसह भारताचा यष्टीरश्रक वृद्धिमान साहा आणि वेगवान गोलंदाज उमेश यादव दिसत होते.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2Vn9aK5
No comments:
Post a Comment