
ऑकलंड: करोनाला पळवणारा पहिला देश म्हणून न्यूझीलंडचे नाव घेतले जायचे. पण आता न्यूझीलंडमध्येच करोना दाखल झाला आहे. कारण न्यूझीलंडच्या दौऱ्यावर गेलेला पाकिस्तानच्या जवळपास संपूर्ण संघच करोना पॉझिटीव्ह असल्याचे आढळले आहे. आतापर्यंत पाकिस्तानच्या १० खेळाडूंना करोना झाला आहे. त्याचबरोबर एका खेळाडूच्या करोना चाचणीचा अहवाल अजून येणार आहे. या सर्व गोष्टीमुळे न्यूझीलंडमध्ये एकच खळबळ उडाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता दौरा होणार की नाही, याबाबत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. न्यूझीलंडच्या दौऱ्यावर गेलेल्या पाकिस्तानच्या खेळाडूंची दुसरी करोना चाचणी करण्यात आली. या चाचणीनंतर एकूण पाकिस्तानच्या १० खेळाडूंना करोना झाल्याचे पाहायला मिळाले आहे. यापूर्वी झालेल्या पहिल्या चाचणीत सात खेळाडू करोना पॉझिटीव्ह असल्याचे समजले होते. त्यानंतर झालेल्या दुसऱ्या करोना चाचणीमध्ये आता तीन अन्य पाकिस्तानच्या खेळाडूंना करोना झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर एका खेळाडू करोनाच्या चाचणीचा अहवाल अजूनपर्यंत आलेला नाही. पाकिस्तानचा संघ आपल्या सपोर्ट स्टाफबरोबर २४ नोव्हेंबरला न्यूझीलंडमध्ये दाखल झाला होता. त्यावेळी पहिल्यांचा त्यांची करोना चाचणी घेण्यात आली होती. शुक्रवारी जेव्हा ही पहिली चाचणी झाली होती. तेव्हा पाकिस्तानच्या संघातील सात सदस्यांना करोना झाल्याचे सांगण्यात आले होते. त्यामुळे या सातही सदस्यांना १४ दिवसांसाठी क्वारंटाइन करण्यात आले होते. त्यानंतर पाकिस्तानच्या संघाची दुसरी करोना चाचणी झाली आणि त्यामध्ये तीन जणांना करोना असल्याचे पाहायला मिळाले. आता पुन्हा एकदा करोनाची तिसरी चाचणी रविवारी करण्यात येणार आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या संघातील नेमक्या किती सदस्यांना करोना झाला आहे, याची पूर्ण माहिती रविवारी सर्वांना समजू शकणार आहे. पाकिस्तानच्या संघातील १० सदस्यांना करोना झाला आहे. पण त्यानंतरही पाकिस्तानच्या संघातील अन्य सदस्यांनी सराव करायचा निर्णय घेतला आहे. जोपर्यंत वैद्यकीय कर्मचारी सराव करण्यापासून रोखत नाहीत, तोपर्यंत पाकिस्तानचा संघ सराव करत राहणार आहे. पाकिस्तानच्या खेळाडूंमुळे न्यूझीलंडमधील करोना रुग्णांची संख्या वाढली असल्याचे आता पाहायला मिळत आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/37nGu9w
No comments:
Post a Comment