सिडनी, : सध्याच्या घडीला भारतीय संघापुढे एक प्रश्न पडला आहे. कारण भारताच्या कसोटी संघात रिषभ पंत आणि वृद्धिमान साहा हे दोन यष्टीरक्षक आहे. त्यामुळे यापैकी पहिल्या सामन्यात नेमकी कोणाला संधी द्यायची, याचा विचार भारतीय संघ करत असेल. पण भारताचे माजी क्रिकेटपटू आणि समालोचक संजय मांजरेकर यांनी मात्र या दोघांपैकी एकाची निवड केली आहे. याबाबत संजय मांजरेकर यांनी एक ट्विट केले आहे आणि त्यांचे हे ट्विट आता चांगलेच व्हायरल झाले आहे. संजय मांजरेकर यांच्यामते ज्या खेळाडूकडे यष्टीरक्षणाचे चांगले कौशल्य आहे, त्याचाच विचार पहिल्यांदा केला जायला हवा. कारण कसोटी सामन्यांमध्ये कौशल्य हे सर्वात महत्वाचं असतं. मांजरेकर यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, " कसोटी क्रिकेटमध्ये यष्टीरक्षणाचे कौशल्य महत्वाचे असते. या दोघांपैकी एकाने स्टीव्हन स्मिथला जीवदान दिले होते आणि त्याने त्यानंतर द्विशतक झळकावले होते. त्यामुळे माझी पहिली पसंती ही वृद्धिमान साहाला असेल. ऑस्ट्रेलियामध्ये वेगवान खेळपट्ट्या असतात आणि चेंडूही वेगाने येतो. त्यामुळे एक चांगला यष्टीरक्षकच भारतीय संघात निवडायला हवा. त्यामुळे साहालाच भारताकडून खेळण्याची संधी द्यायला हवी, असे मला वाटते." दुसऱ्या सराव सामन्यात सामन्यात रिषभ पंत हा यष्टीरक्षण करत होता, पण साहाने यावेळी आपल्याकडे आलेली या कॅचची संधी सोडली नाही. मोहम्मद सिराजच्या १६व्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर ऑस्ट्रेलियाच्या निक मॅडिसनने जोरदार फटका लगावला. हा फटका आता चौकार जाणार असे वाटायला लागले होते. पण या चेंडूच्या मागे विरुद्ध दिशेने साहा धावत गेला. चेंडूच्या विरुद्ध दिशेने धावणे सोपे नसते. पण साहाने यावेळी चेंडूचा पाठलाग केला आणि एक भन्नाट कॅच पकडली. साहाच्या या कॅचचा व्हिडीओ आता चांगलाच व्हायरल झाला आहे. वृद्धिमान साहाच्या एका भन्नाट कॅचची चर्चा सध्याच्या घडीला क्रिकेट विश्वामध्ये चांगली रंगत आहे. साहाच्या या कॅचचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झालेला आहे. काही चाहत्यांना यावेळी साहाची कॅच पाहून कपिल देव यांचा विश्वचषकाच्या अंतिम फेरीतील झेल आठवला आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3gKNFwM
No comments:
Post a Comment