सिडनी : भारताने ट्वेन्टी-२० मालिका जिंकली असली तरी भारताचा कर्णधार विराट कोहलीचं टेन्शन आता वाढलेले आहे. कारण आता काही दिवसांमध्ये पहिला कसोटी सामना खेळवण्यात येणार आहे. त्यामुळे कोहलीवर एका महत्वाच्या गोष्टीमुळे जबरदस्त दडपण आल्याचे म्हटले जात आहे. भारतीय संघ आतापर्यंत दोन सराव सामने खेळला आहे. पण या दोन्ही सामन्यांमध्ये भारतीय संघाला चांगली सलामी अजून मिळालेली नाही. पहिल्या सामन्यात तर दोन्ही सलामीवीर झटपट बाद झाले होते. या दुसऱ्या सामन्यात भारताचा सलामीवीर मयांक अगरवालला फक्त दोनच धावा बनवता आल्या. मयांकने आयपीएलमध्ये दमदार कामगिरी केली होती. पण ऑस्ट्रेलियातील वनडे मालिकेत मयांक धावा करण्यात अपयशी ठरला होता. त्याचबरोबर सराव सामन्यातही मयांककडून जास्त धावा होत नसल्याचेच पाहायला मिळत आहे. भारताचा दुसरा सलामीवीर पृथ्वी शॉ याला पहिल्या सराव सामन्यातील पहिल्या डावात भोपळाही फोडता आला नव्हता. त्यानंतर या सामन्यातील दुसऱ्या डावात त्याला १९ धावा करता आल्या होत्या. पण दुसऱ्या सराव सामन्यात पृथ्वीने आठ चौकारांच्या जोरावर ४० धावा केल्या. पण एवढी चांगली सुरुवात करूनही पृथ्वीला यावेळी मोठी खेळी साकारता आली नाही. त्याचबरोबर पहिल्या सराव सामन्यात शुभमन गिलला सलामीला पाठवण्यात आले होते, पण तोदेखील मोठी धावसंख्या उभारण्यात अपयशी ठरला आहे. जोपर्यंत कोणत्याही संघाची सुरुवात चांगली होत नाही, तोपर्यंत त्यांना मोठी धावसंख्या उभारता येत नाही. सराव सामन्यात भारतीय सलामीवीर हे सातत्याने अपयशी ठरताना दिसत आहेत. त्यामुळे कोहलीपुढे हेच सर्वात मोठं टेन्शन असेल. कारण जर सलामीवीर लवकर बाद झाले तर मोठी धावसंख्या कशी उभारायची, याचा विचार कोहली करत असेल. दुसऱ्या सराव सामन्यात बुमराने भारताची लाज राखली. अखेरच्या जोडीसाठी जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांनी ७१ धावांची भागिदारी करत भारताची लाज राखली. बुमराह ५५ धावांवर नाबाद राहिला. त्याने ५७ चेंडूत ६ चौकार आणि दोन षटकारांसह ही खेळी केली. सिराज २२ धावांवर बाद झाला.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3gAnJUx
No comments:
Post a Comment