सिडनी, : पहिल्या कसोटी सामन्याला फक्त दोन दिवस उरले असताना आता ऑस्ट्रेलियाच्या संघाला मोठा धक्का बसल्याचे पाहायला मिळत आहे. दुखापतीमुळे डेव्हिड वॉर्नर पहिल्या कसोटी सामन्यात खेळणार नाही. पण वॉर्नरनंतर ऑस्ट्रेलियाच्या संघातील सर्वात महत्वाच्या खेळाडूला दुखापत झाली असून त्याने सराव करायचे सोडून दिले आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार आणि धडाकेबाज फलंदाज स्टीव्हन स्मिथला सराव करत असताना दुखापत झाल्याचे पाहायला मिळत आहे. सराव करत असताना स्मिथच्या पाठिला दुखापत झाली आहे. ही दुखापत गंभीर असल्यामुळे स्मिथने सराव करायचा सोडून दिले आहे आणि तो सध्या विश्रांती घेत आहे. त्यामुळे आता स्मिथची दुखापत गंभीर असेल तर तो पहिल्या सामन्यात खेळणार की नाही, याची उत्सुकता चाहत्यांना असेल. सराव करत असताना स्मिथ हा चेंडू घेण्यासाठी खाली वाकला आणि त्यानंतर त्याच्या पाठीमध्ये दुखायली सुरुवात झाली. ही दुखापत गंभीर स्वरुपाची असल्यामुळे स्मिथ आजचा पूर्ण दिवस विश्रांती घेणार असल्याचे ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट मंडळाने सांगितले आहे. सध्याच्या घडीला ऑस्ट्रेलियाचे सात खेळाडू दुखापतग्रस्त झाले आहेत. त्यामध्येच जर स्मिथची दुखापत गंभीर असेल तर तो ऑस्ट्रेलियाच्या संघासाठी मोठी धक्का ठरू शकतो. त्यामुळे स्मिथ हा सराव करायला उतरणार की नाही आणि तो पहिल्या कसोटी सामन्यात खेळणार की नाही, याबाबत संभ्रमाचे वातावरण आहे. कसोटी मालिका१) पहिली कसोटी- १७ ते २१ डिसेंबर, एडिलेड ओव्हल- डे/नाईट (सकाळी ९ वाजता) २) दुसरी कसोटी- २६ ते ३० डिसेंबर, मेलबर्न (पहाटे ५ वाजता) ३) तिसरी कसोटी- ७ ते ११ जानेवारी २०२१, सिडनी (पहाटे ५ वाजता) ४) चौथी कसोटी- १५ ते १९ जानेवारी, २०२१, गाबा (पहाटे साडे पाच वाजता) भारताच्या या दौऱ्यातील सर्व सामन्याचे लाइव्ह प्रक्षेपण सोनी सिक्स आणि डीडी स्पोट्स वर होणार आहे. या शिवाय Sony LIVवर लाइव्ह स्ट्रीमिंग होईल. कसोटी मालिका फक्त सोनी सिक्स आणि Sony LIV वर दिसेल. या शिवाय भारतीय संघ दोन सराव सामने खेळणार आहे. या सामन्याचे लाइव्ह प्रक्षेपण क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या अॅपवर केले जाणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या लढतीचे LIVE UPDATE आणि स्कोअरकार्ड महाराष्ट्र टाइम्सच्या वेबसाइटवर तुम्ही पाहू शकता.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3mjokuT
No comments:
Post a Comment