आयपीएलमधील स्पॉट फिक्सिंगप्रकरणी भारताचा वेगवान गोलंदाज एस. श्रीशांतवरील बंदी उठल्यानंतर आता तो मैदानाता पाहायला मिळणार आहे. एक मोठी स्पर्धा येत्या काही दिवसांमध्ये भारतामध्ये होणार आहे. या स्पर्धेत श्रीशांत आपल्याला खेळताना दिसू शकतो. त्यामुळे सात वर्षांच्या कालावधीनंतर श्रीशांत आता पुन्हा एकदा मैदानात गोलंदाजी करणार आहे. केरळ क्रिकेट संघटनेने श्रीशांतला आपल्या संभाव्य संघात स्थान दिले आहे. श्रीशांतने लॉकडाउनच्या काळात नेटमध्ये जोरदार सराव केला होता. त्याच बरोबर फिटनेसवर देखील लक्ष दिले होते. श्रीशांत आता २० डिसेंबरपासून संघाबरोबर सराव करणार आहे. यावेळी श्रीशांतबरोबर संजू सॅमसनदेखील या स्पर्धेत खेळणार असल्याचे समजते आहे. करोनानंतर भारतामध्ये बीसीसीआयने सय्यद मुश्ताक अली ट्वेन्टी-२० स्पर्धा खेळवण्याचे ठरवले आहे. ही स्पर्धा १० जानेवारीपासून सुरु होणार आहे. त्यासाठी २ जानेवारीला सर्व खेळाडूंना बीसीसीआयने ठेरवलेल्या केंद्रांवर जायचे आहे. स्पॉटफिक्सिंगप्रकरणी ३६ वर्षीय श्रीशांतवर ऑगस्ट २०१३मध्ये बंदी घालण्यात आली होती. सोबत राजस्थान रॉयल्सचा त्याचा सहकारी अजित चंडिला आणि अंकित चव्हाण यांच्यावरही बंदी घातली गेली होती. जैन यांनी ७ ऑगस्टला दिलेल्या आदेशानुसार ही बंदी सात वर्षांवर आणण्यात आली असल्यामुळे त्याला ऑगस्ट २०२०ला पुन्हा क्रिकेट खेळता येईल. जैन यांनी ही बंदी कमी करण्यामागील कारण सांगितले की, श्रीशांतचे वय तिशीपलीकडे आहे. क्रिकेटपटू म्हणून त्याचा उच्च कामगिरी करण्याचा काळ आता संपुष्टात आला आहे. बीसीसीआयने २८ फेब्रुवारीला सर्वोच्च न्यायालयात सांगितले की, सामन्यात हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न श्रीशांतने केल्यामुळे त्याच्यावरील बंदी योग्यच आहे. त्यावर श्रीशांतच्या वकिलांनी सांगितले की, आयपीएल सामन्यादरम्यान कोणतेही स्पॉटफिक्सिंग झालेच नव्हते. त्याला आधार असलेले कोणतेही पुरावे नाहीत. बीसीसीआयचे वकील त्रिपाठी यांनी सांगितले की, दूरध्वनीवर झालेल्या संभाषणातून पैशांची देवाणघेवाण झाल्याचे स्पष्ट होते. आयपीएलमध्ये १४ धावा देण्यासाठी श्रीशांतला १० लाख देण्यात आले होते. श्रीशांतनेही हे आरोप फेटाळून लावले होते. त्यानंतर श्रीशांतचा क्रिकेट खेळण्याचा मार्ग मोकळा झाला होता.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3r0WI10
No comments:
Post a Comment