सिडनी, : : दुसऱ्या सराव सामन्यात भारतीय गोलंदाजांची धुलाई झालेली पाहायला मिळाली. त्यामुळेच भारतीय संघाला विजयाची संधी गमवावी लागली. भारतीय संघाला या सामन्यात विजय मिळवण्याचीी नामी संधी होती. पण गोलंदाजांना भेदक मारा करता आला नाही आणि भारतीय संघाला सामना जिंकता आला नाही. दुसऱ्या सराव सामन्यात भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाच्या 'अ' संघापुढे आजच्या अखेरच्या दिवशी विजयासाठी ४७३ धावांचे आव्हान ठेवले होते. भारताने ऑस्ट्रेलियाची २ बाद ११ अशी अवस्था केली होती. त्यावेळी भारतीय संघ हा सामना जिंकेल, असे वाटत होते. पण त्यानंतर भारतीय गोलंदाजांची लय बिघडली आणि भारताला सामना जिंकता आला नाही. भारताने ऑस्ट्रेलियाच्या संघाला पहिल्या डावात १०८ धावांवर सर्व बाद केले होते. त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या संघापुढे विजयासाठी ४७३ धावांचे आव्हान ठेवले होते. भारताने यावेळी चांगली सुरुवातही केली होती. भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने यावेळी ऑस्ट्रेलियाच्या दोन्ही सलामीवीरांना झटपट बाद केले. त्यावेळी ऑस्ट्रेलियाची २ बाद ११ अशी अवस्था होती. त्यानंतर भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने ऑस्ट्रेलियाला तिसरा धक्का दिला आणि त्यांची ३ बाद २५ अशी अवस्था केली होती. भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला सुरवातीलाच तीन धक्के दिले होते. त्यानंतर भारतीय गोलंदाज सातत्याने विकेट्स मिळवतील आणि संघाला विजय मिळवून देतील, असे वाटले होते. पण त्यानंतर मात्र भारतीय गोलंदाजांची लय बिघडलेली पाहायला मिळाली. कारण त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या बेन मॅकडरमॉटने नाबाद शतक झळकावले. त्याचबरोबर यष्टीरक्षक अॅलेक्स करीने ५८ धावांची दमदार खेळी साकारली. अॅलेक्सला यावेळी हनुमा विहारीने बाद केले. पण त्यानंतर भारताची या सामन्यावरची पकड ढिली झाली. कारण बेनबरोबर जॅक विल्डरमुथनेही नाबाद शतक झळकावले आणि भारतीय संघाला विजयापासून परावृत्त केले. बेनने यावेळी ऑस्ट्रेलियाच्या संघाला सावरले आणि त्याने १६ चौकारांच्या जोरावर नाबाद १०७ धावांची महत्वपूर्ण खेळी साकारली. त्यानंतर जॅकनेही भारतीय गोलंदाजीवर चौफेर हल्ला चढवला आणि १२ चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर नाबाद १११ धावांची खेळी साकारली.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3a5yBZ7
No comments:
Post a Comment