कराची : सध्याच्या घडीला पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी हा चांगलाच भडकलेला पाहायला मिळत आहे. कारण काही दिवसांपूर्वी आफ्रिदीबाबत एक अफवा उठवण्यात आली होती. या गोष्टीचा चांगलाच समाचार आता आफ्रिदीने घेतला आहे. त्याचबरोबर अफवा पसरवणाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले आहे. काही दिवसांपूर्वी आफ्रिदी हा श्रीलंकेमध्ये लंका प्रीमिअर लीग खेळत होता. त्यानंतर काही दिवसांनी आफ्रिदी हा मायदेशी परतला. त्यावेळी आफ्रिदीच्या मुलीची तब्येत बिघडली असून तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे, असे वृत्त प्रसारित झाले होते. पण हे वृत्त खरे नव्हते तर ती एक अफवा होती. या अफवेमुळे आफ्रीदी हा दुखावला गेला आहे. त्यामुळेच आफ्रीदीने आता पाकिस्तानमधील एका न्यूज चॅलेनवर आपली निराशा बोलून दाखवली आहे. यावेळी आफ्रिदी म्हणाला की, " माझी मुलगी आजारी नाही आहे. सोशल मीडियावरून माझ्या मुलीबाबत अफवा पसरवली गेली. सोशल मीडियाचा वापर करणारे लोकं यासाठी जबाबदार आहेत. कारण त्यांनीच माझ्या मुलीबाबत अफवा पसरवली आहे. त्यामुळे या व्यक्तींना आता कडक शासन व्हायला हवे. कारण या अफवेचा विपरीत परीणाम माझ्यावर झाला आहे." आफ्रिदीने सोशल मीडियावर एक पोस्ट केली होती. ज्यामध्ये आफ्रिदीने वैयक्तीक कारणामुळे मायदेशात परत असल्याचे सांगितले. त्यानंतर लंका प्रीमिअर लीगनेही एक पोस्ट सोशल मीडियावर केली होती. ज्यामध्ये आफ्रिदी आणि त्याच्या मुलीचा फोटो होता. या फोटोमध्ये आफ्रिदीची मुलगी ही हॉस्पिटलमध्ये असल्याचे दिसत होते. त्यानुसारच सोशल मीडियावरआफ्रिदीची चर्चा रंगली होती. पण आता आफ्रिदीनेच या गोष्टीचा इन्कार केल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे शाहिद आफ्रिदिने सोशल मीडियावर तोंडसुख घेण्यापूर्वी लंका प्रीमिअर लीगला याबाबत नेमके काय सांगितले होते, याचा खुलासा अजूनही झालेला नाही. कारण लंका प्रीमिअर लीगटने जर ही पोस्ट टाकली नसती तर आफ्रिदीबाबत कोणालाही समजले नसते. त्यामुळे आफ्रिदीने लंका प्रीमिअर लीगशी याबाबत संवाद साधला आहे की नाही, हे अजून स्पष्ट झालेले नाही.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/37aJU0h
No comments:
Post a Comment