सिडनी, : भारताचा कर्णधार विराट कोहली हा ऑस्ट्रेलियामध्ये एकमेव कसोटी सामना खेळणार आहे. पण या सामन्यापूर्वी कोहलीला तिन्ही एकदिवसीय सामन्यांमध्ये बाद केलेल्या ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजाने आता शाब्दिक हल्ला चढवला आहे. या गोलंदाजाने विराटबद्दल नेमके काय म्हटले आहे, पाहा... ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जोश हेझलवूडने पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी कोहलीबाबत म्हटले आहे की, " एकदिवसीय क्रिकेट मालिकेतील तिन्ही सामन्यांत मी कोहलीला बाद केले होते. त्यामुळे त्याच्यासमोर जेव्हा कसोटी सामन्यात मी उतरेन तेव्हा माझा आत्मविश्वास चांगलाच उंचावलेला असेल. त्याचबरोबर कोहली फक्त एकच कसोटी सामना खेळणार आहे. त्यामुळे या सामन्यात त्याच्याविरुद्ध सर्वोत्तम गोलंदाजी करून त्याला लवकर बाद करण्याचा माझा प्रयत्न असेल. कारण जेव्हा तुम्ही एखाद्या खेळाडूला बऱ्याचदा बाद करता तेव्हा तुम्हाला त्याच्या फलंदाजीमधील कच्चे दुवे समजत असतात, या गोष्टीचाच फायदा मला होणार आहे." पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी कोहलीवर दडपण आणायला ऑस्ट्रेलियाच्या संघातील खेळाडूंनी सुरुवात केली आहे. हेझलवूडने कोहलीला तिनदा बाद केले होते. त्यामुळे कसोटी मालिकेतही कोहलीवर कसे दडपण वाढवता येईल, यासाठी हेझलवूड प्रयत्न करत आहे. त्यामुळेच पहिला कसोटी सामना सुरु होण्यापूर्वी हेझलवूडने कोहलीवर शाब्दिक हल्ला चढवल्याचे म्हटले जात आहे. हेझलवूड पुढे म्हणाला की, " कोहली फक्त एकच कसोटी सामना खेळणार आहे. त्यामुळे त्याला आम्हाला फक्त दोनदाच बाद करायचे आहे. त्यामुळे आमच्यापुढील काम फारसे कठिण नाही. कोहलीविरुद्ध खेळताना जर चांगली सुरुवात झाली तर नक्कीच त्याचा फायदा आम्हाला होणार आहे. त्यामुळे कोहलीविरुद्ध आता नेमकी रणनिती काय आखायची, यावर मी लक्ष केंद्रीत केले आहे." कसोटी मालिका १) पहिली कसोटी- १७ ते २१ डिसेंबर, एडिलेड ओव्हल- डे/नाईट (सकाळी ९ वाजता) २) दुसरी कसोटी- २६ ते ३० डिसेंबर, मेलबर्न (पहाटे ५ वाजता) ३) तिसरी कसोटी- ७ ते ११ जानेवारी २०२१, सिडनी (पहाटे ५ वाजता) ४) चौथी कसोटी- १५ ते १९ जानेवारी, २०२१, गाबा (पहाटे साडे पाच वाजता) भारताच्या या दौऱ्यातील सर्व सामन्याचे लाइव्ह प्रक्षेपण सोनी सिक्स आणि डीडी स्पोट्स वर होणार आहे. या शिवाय Sony LIVवर लाइव्ह स्ट्रीमिंग होईल. कसोटी मालिका फक्त सोनी सिक्स आणि Sony LIV वर दिसेल. या शिवाय भारतीय संघ दोन सराव सामने खेळणार आहे. या सामन्याचे लाइव्ह प्रक्षेपण क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या अॅपवर केले जाणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या लढतीचे LIVE UPDATE आणि स्कोअरकार्ड महाराष्ट्र टाइम्सच्या वेबसाइटवर तुम्ही पाहू शकता.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/380aqZn
No comments:
Post a Comment