Ads

Monday, December 14, 2020

IND vs AUS : ऑस्ट्रेलियाच्या 'या' खेळाडूकडून भारताला सर्वाधिक धोका, सचिन तेंडुलकरने केला खुलासा

सिडनी, : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी सामना काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. या कसोटी मालिकेत भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाच्या एका खेळाडूकडून सर्वाधिक धोका असल्याचे मत भारताचा माजी महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने व्यक्त केले आहे. यावेळी सचिनने सांगितल की, " ऑस्ट्रेलियाचा हा संघ चांगलाच तुल्यबळ आहे. पण ऑस्ट्रेलियाच्या या संघातील एक खेळाडू भारतासाठी डोकेदुखी ठरू शकतो आणि तो खेळाडू आहे मार्नस लाबुशेन. कारण गेल्यावेळी जेव्हा भारतीय संघ ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी मालिका खेळला होता. तेव्हा लाबुशेन हा संघात नव्हता. त्याचबरोबर कसोटी क्रिकेटमध्ये लाबुशेन दमदार कामगिरी केलेली आहे. त्यामुळे लाबुशेनकडून भारतीय संघाला सर्वात जास्त धोका आहे, असे मला वाटते." सचिन पुढे म्हणाला की, " गेल्यावेळी जेव्हा भारतीय संघ ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी मालिका खेळला होता, तेव्हा त्यांच्या संघात लाबुशेन, डेव्हिड वॉर्नर आणि स्टीव्हन स्मिथ हे तिन्ही फलंदाज नव्हते. पण या मालिकेत मात्र ते खेळणार आहेत. त्यामुळे गेल्यावेळच्या ऑस्ट्रेलियाच्या संघाची तुलना केली तर यावेळी त्यांचा संघ मजबूत आहे. जेव्हा अनुभवी खेळाडू नसतात तेव्हा संघाची कामगिरी चांगली होत नाही. पण यावेळी मात्र ऑस्ट्रेलियाच्या संघात चांगले अनुभवी खेळाडू आहेत." दोन वर्षापूर्वी भारतीय संघाने विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली इतिहास घडवला होता. टीम इंडियाने ऑस्ट्रेलियात प्रथमच कसोटी मालिका जिंकली होती. भारताच्या दिग्गज कर्णधारांना ७१ वर्षात जे जमले नव्हते ते विराट कोहलीने करून दाखवले होते. आता भारतीय संघ पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियात त्यांच्याविरुद्ध कसोटी मालिकेत लढत आहे. कसोटी मालिका१) पहिली कसोटी- १७ ते २१ डिसेंबर, एडिलेड ओव्हल- डे/नाईट (सकाळी ९ वाजता) २) दुसरी कसोटी- २६ ते ३० डिसेंबर, मेलबर्न (पहाटे ५ वाजता) ३) तिसरी कसोटी- ७ ते ११ जानेवारी २०२१, सिडनी (पहाटे ५ वाजता) ४) चौथी कसोटी- १५ ते १९ जानेवारी, २०२१, गाबा (पहाटे साडे पाच वाजता) भारताच्या या दौऱ्यातील सर्व सामन्याचे लाइव्ह प्रक्षेपण सोनी सिक्स आणि डीडी स्पोट्स वर होणार आहे. या शिवाय Sony LIVवर लाइव्ह स्ट्रीमिंग होईल. कसोटी मालिका फक्त सोनी सिक्स आणि Sony LIV वर दिसेल. या शिवाय भारतीय संघ दोन सराव सामने खेळणार आहे. या सामन्याचे लाइव्ह प्रक्षेपण क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या अॅपवर केले जाणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या लढतीचे LIVE UPDATE आणि स्कोअरकार्ड महाराष्ट्र टाइम्सच्या वेबसाइटवर तुम्ही पाहू शकता.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2KqAchf

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...