नवी दिल्ली: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या टी-२० मालिकेत भारताने ऑस्ट्रेलियावर २-१ असा विजय मिळवला. या मालिकेत हार्दिक पंड्याला मालिकावीर पुरस्कार दिला गेला. अखेरच्या लढतीनंतर मिळालेला पुरस्कार त्याने पदार्पणाची आंतरराष्ट्रीय टी-२० मालिका खेळणाऱ्या याला दिला. या घटनेनंतर हार्दिकचे सर्व जण कौतुक करत होते. वाचा- सोशल मीडियावर हार्दिकने अनेकांनी कौतुक केले. आता पाकिस्तानचा माजी फिरकीपटू याने देखील हार्दिकचे कौतुक केले. त्याच बरोबर पाकिस्तान क्रिकेटला घरचा आहेर देखील दिला. वाचा- ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-२० सामन्यात टी नटराजनने सर्वाधिक विकेट घेतल्या. या मालिकेत मोठी धावसंख्या उभारली गेली आणि गोलंदाजांची धुलाई झाली होती. पण नटराजनने अतिशय कमी धावा दिल्या. पाकिस्तानचा माजी फिरकीपटू दानिश कनेरियाने हार्दिकचे केले. वाचा- सोशल मीडियावर पोस्ट करताना तो म्हणतो, हार्दिक पंड्याने नटराजनला मॅन ऑफ द सीरीज पुरस्कार देऊन लोकांची मने जिंकली. युवा खेळाडूंना प्रोत्साहन दिले पाहिजे. आमच्याकडे (पाकिस्तानमध्ये) कधी कोणत्या खेळाडूने असे केले नाही. प्रत्येक जण स्वत:चा विचार करतो. वाचा- हार्दिकचे कौतुक करण्याआधी दानिश कनेरियाने नटराजनचे देखील कौतुक केले. त्याने दुसऱ्या टी-२० सामन्यात चार षटकात २० धावा देत दोन विकेट घेतल्या होत्या. तेव्हा ऑस्ट्रेलियाने १९४ धावा केल्या. भारतीय संघाने हे लक्ष्य अखेरच्या षटकात पार केले होते.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2WeABGs
No comments:
Post a Comment