
सिडनी, : भारताचा मुख्य वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा सध्याच्या घडीला वाईट फॉर्ममध्ये आहे. कारण गेल्या दोन एकदिवसीय मालिकांमध्ये त्याच्या नावावर फक्त दोनच विकेट्स आहे. त्याचबरोबर गेल्या दोन सामन्यांमध्ये त्याने १५२ धावा दिल्या आहेत. त्यामुळे आपल्या कामगिरीवर बुमरा नक्कीच निराश असेल. पण यावेळी रागाच्या भरात बुमराने एक नकोसे काम केलेले पाहायला मिळाले आहे. बुमराचे अपयश हेदेखील भारताच्या पराभवाचे एक महत्वाचे कारण आहे. कारण गेल्या सहा सामन्यांमध्ये त्याला दोनच बळी मिळवता आल्या आहेत. या सर्व दडपणाखाली असताना दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात बुमराकडून एक नकोशी गोष्ट पाहायला मिळाली. बुमराला या सामन्यात आपल्या रागावर नियंत्रण मिळता आले नाही. त्याचमुळे मैदानात फिल्डींग मार्करला त्याने लाथ मारल्याचे दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात पाहायला मिळाले. बुमराने आपल्या वाईट गोलंदाजीचा राग मैदानात अशाप्रकारे काढल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर एका चाहत्याने हा फोटो आपल्या ट्विटरवर पोस्ट केला. त्यानंतर हा बुमराचा फोटो चांगलाच व्हायरल झाला असून लोकांनी त्याला ट्रोल करायला सुरुवात केली आहे. बुमरा हा शांत स्वभावाचा गोलंदाज असल्याचे आतापर्यंत आपण सर्वांनी पाहिले आहे. पण सध्याच्या बुमरा हा आपल्या कामगिरीवर निराश आहे. ऑस्ट्रेलियातील दोन एकदिवीसीय सामन्यांमध्ये बुमराकडून अचूक गोलंदाजी पाहायला मिळालेली नाही. ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी बुमराच्या गोलंदाजीचा चांगलाच समाचार घेतला आहे. हीच गोष्ट कुठेतरी बुमराला सतावत असेल. त्यामुळे बुमराकडून मैदानात ही नकोशी गोष्ट पाहायला मिळाली होती. यापूर्वी न्यूझीलंडमध्ये झालेल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत बुमराला एकही विकेट मिळवता आली नव्हती. त्यानंतर आता दोन सामन्यांमध्ये फक्त दोनच विकेट्स बुमराच्या नावावर आहेत. त्यामुळे या मालिकेत झालेल्या भारतीय पराभवाचे एक कारण बुमराची वाईट गोलंदाजी असल्याचेही म्हटले जात आहे. आयपीएलनंतर बुमराकडून चांगली गोलंदाजी पाहायला मिळालेली नाही. पण आता ट्वेन्टी-२० क्रिकेट मालिकेत बुमरा कशी कामगिरी करतो, याकडे सर्वांचे लक्ष असेल.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/36qck68
No comments:
Post a Comment