
नवी दिल्ली: बॉलिवूड स्टार शाहरूख खानने भारतातील आयपीएल () आणि कॅरेबियन प्रीमियर लीग () मध्ये संघ विकत घेतल्यानंतर आता त्याने अमेरिकेतील टी-२० लीगमध्ये गुंतवणूक केली आहे. शाहरूखने अमेरिकेतील टी-२० लीगमध्ये नवा संघ विकत घेतला आहे. शाहरूखकडे आयपीएलमधील कोलकाता आणि सीपीएलमध्ये ट्रिनबागो नाइट रायडर्स असे दोन संघ आहेत. आता त्याने लॉस एजलिस हा संघ विकत घेतला आहे. वाचा- शाहरूखच्या या नव्या संघाचे नाव लॉस एजलिस नाइट रायडर्स असे ठेवण्यात आले आहे. भारतातील आयपीएल प्रमाणेच अमेरिकेत टी-२० लीग स्पर्धा होणार आहे. माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार या लीगमध्ये सहा संघ असणार आहेत. यात सॅन फ्रान्सिस्को, वॉशिंग्टन डीसी, शिकागो, डलास, न्यूयॉर्क आणि लॉस एजलिस हे संघ असतील. अमेरिकन क्रिकेट एटरप्रायझेसचे सहसंस्थापक विजय श्रीनिवासन यांनी सांगितली की, यामुळे अमेरिकेतील क्रिकेट वाढण्यास मदत मिळेल. वाचा- नाइट रायडर्स फ्रेंचाइझीचे सीईओ वेंकी म्हैसूर यांनी सांगितले की, अमेरिकेतील मार्केट हे जगातील सर्वात मोठे मार्केट आहे. अमेरिकेतील ही क्रिकेट लीग मल्टी मिलियन डॉलर टी-२० स्पर्धा असेल. ही स्पर्धा २०२१च्या जुलै महिन्यात सुरू होईल. या स्पर्धेचा कालावधी ९ आठवडे असेल. अधिकतर सामने आठवड्याच्या अखेरीस होतील. वाचा-
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/33uUvBa
No comments:
Post a Comment