Ads

Tuesday, December 1, 2020

टी-२० मध्ये या खेळाडूने इतिहास घडवला; धोनी आणि विराटचा विक्रम मागे टाकला

नवी दिल्ली: दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या दुसऱ्या टी-२० सामन्यात इंग्लंडने चार विकेटनी विजय मिळवला आणि मालिका २-० अशी जिंकली. प्रथम फलंदाज करत दक्षिण आफ्रिकेने १४७ धावा केल्या होत्या. इंग्लंडने १९.५ षटकात हे लक्ष्य पार केले. वाचा- इंग्लंडकडून मलानने ४० चेंडूत ७ चौकार आणि एक षटकाराच्या मदतीने ५५ धावा केल्या. तर कर्णधार () २६ धावांवर नाबाद राहिला. या विजयासह मॉर्गनने एक खास विक्रम स्वत:च्या नावावर केला. दक्षिण आफ्रिकेच्या भूमीवर इंग्लंडने सलग चौथा टी-२० विजय मिळवला आहे. जगातील कोणत्याही कर्णधाराला अशी कामगिरी करता आली नाही. त्याच बरोबर मॉर्गनच्या नेतृत्वाखाली टी-२० मध्ये इंग्लंडने आफ्रिकेवर सहाव्यांदा विजय मिळवला. आफ्रिकेविरुद्ध टी-२० मध्ये सर्वाधिक विजय मिळवणारा तो कर्णधार झाला आहे. वाचा- याआधी हा विक्रम भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीच्या नावावर होता. त्याने आफ्रिकेविरुद्ध पाच टी-२० सामन्यात विजय मिळवला होता. त्याच बरोबर मॉर्गनने भारताचा कर्णधार विराट कोहलीचा विक्रम देखील मागे टाकला. दुसऱ्या टी-२० लढतीत मॉर्गन २६ धावांवर नाबाद राहिला. वाचा- धावांचा पाठलाग करताना सहा वेळा नाबाद राहिला होता. मॉर्गनने ही कामगिरी सात वेळा केली. या यादीत सर्वात अव्वल स्थानी महेंद्र सिंह आहे. धोनीने टी-२०मध्ये १२ वेळा अशी कामगिरी केली आहे. वाचा- टी-२० लढतीमधील अखेरची आणि अंतिम लढत आज होणार असून भारतीय वेळेनुसार रात्री साडे नऊ वाजता ही मॅच सुरू होईल. इंग्लंडने २-० अशी आघाडी घेतल्याने आफ्रिकेसाठी ही प्रतिष्ठेची लढत आहे. वाचा-


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3o7iIoI

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...