नवी दिल्ली, : करोना, लॉकडाऊन या सर्व गोष्टींनंतर पुणेकरांसाठी एक आनंदाची बातमी आली आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील दौऱ्याचे वेळापत्रक आता जाहीर झाले आहे. या वेळापत्रकानुसार पुणेकरांना आता सुवर्णसंधी मिळणार आहे. कारण या दौऱ्यातील फक्त एक नाही तर त्यापेक्षा जास्त सामने आता पुण्यात होणार आहे. करोनानंतर इंग्लंडच्या दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर करताना बीसीसीआयने खबरदारीचे काही उपाय घेतले आहेत. त्यानुसार भारत आणि इंग्लंड यांच्यातील जास्त सामने एकाच ठिकाणी खेळण्यावर बीसीसीआयने भर दिला आहे. जेणेकरून संघांना जास्त प्रवास करावा लागू नये आणि त्याचबरोबर करोनापासूनही त्यांना सुरक्षित ठेवता येऊ शकते. भारत आणि इंग्लंड यांच्यातील संपूर्ण एकदिवसीय मालिकाच पुण्यात रंगणार आहे. या एकदिवसीय मालिकेत तीन सामने होणार आहेत. यामधील पहिला एकदिवसीय सामना २३ मार्चला होणार आहे. त्यानंतर दुसरा एकदिवसीय सामना २६ मार्चला होणार आहे. या मालिकेतील तिसरा आणि अखेरचा एकदिवसीय सामना २८ मार्चला खेळवण्यात येणार आहे. त्यामुळे भारत आणि इंग्लंड यांच्यातील संपूर्ण एकदिवसीय मालिका पाहण्याची पर्वणी आता पुणेकरांना मिळणार आहे. कसोटी मालिकेचे वेळापत्रकपहिली कसोटी, चेन्नई- ५ ते ९ फेब्रुवारी दुसरी कसोटी, चेन्नई- १३ ते १७ फेब्रुवारी तिसरी कसोटी, अहमदाबाद- २४ ते २८ फेब्रुवारी (डे-नाईट) चौथी कसोटी, अहमदाबाद- ४ ते ८ मार्च टी-२० मालिकेचे वेळापत्रकपहिली मॅच- १२ मार्च दुसरी मॅच- १४ मार्च तिसरी मॅच- १६ मार्च चौथी मॅच- १८ मार्च पाचवी मॅच- २० मार्च (कसोटी मालिकेनंतर पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेला सुरूवात होईल. या सर्व लढती अहमदाबाद येथेच होतील.) वनडे सामन्यांचे वेळापत्रकपहिली वनडे- २३ मार्च दुसरी वनडे- २६ मार्च तिसरी वनडे- २८ मार्च (इंग्लंड दौऱ्याची अखेर तीन सामन्यांच्या वनडे मालिकेने होणार आहे. टी-२० प्रमाणेच वनडे मालिका एकाच ठिकाणी होईल. या सर्व लढती पुण्यात होणार आहेत.)
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3lYFXjy
No comments:
Post a Comment