Ads

Thursday, December 10, 2020

२०२० मध्ये घडली करोना व्हायरसला मागे टाकणारी घटना; क्लिक करा आणि जाणून घ्या

नवी दिल्ली: २०२० मध्ये पेक्षा मोठी कोणतीही घटना झाली नसेल या विधानावर कोणीही हरकत घेणार नाही. लाखो लोकांचा मृत्यू, लॉकडाउनमुळे अर्थव्यवस्थेवर झालेले परिणाम आणि लाखो लोकांच्या गेलेल्या नोकऱ्या यामुळे करोनामुळे २०२० हे वर्ष वाया गेले. पण करोनावर मात करणारी एक गोष्ट या वर्षात घेतली आहे. आता तुम्हाला ही प्रश्न पडेल की करोना पेक्षा चर्चेत असेलली कोणती गोष्टी असेल. तर त्याचे उत्तर दिले आहे गुगलने... वाचा- गुगलने २०२० मधील टॉप ट्रेंडसची () घोषणा केली. यात भारतीय लोकांचे क्रिकेटबाबतचे प्रेम किती अधिक आहे हे दिसून आले. करोनामुळे यावर्षी आयपीएल प्रथम स्थगित करण्यात आले. त्यानंतर भारतात करोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने स्पर्धा युएईमध्ये घेण्यात आली. देशात बाहेर प्रथमच संपूर्ण आयपीएलचे आयोजन करण्यात आले. पण त्याची लोकप्रियता कमी तर झालीच नाही उटल जास्त वाढली. वाचा- जगातील सर्वात श्रीमंत टी-२० लीग स्पर्धा असलेल्या आयपीएलने गुगलवर सर्चच्या बाबत करोना व्हायरसला देखील मागे टाकले आहे. करोनाला मागे टाकत आयपीएल संदर्भात लोकांनी सर्वाधिक सर्च केल्याचे आढळले आहे. २०२० मध्ये गुगलवर सर्च झालेल्या आघाडीच्या गोष्टींची यादी जाहीर केली. यात आयपीएल अव्वल स्थानी आहे. गेल्या वर्षी म्हणजेच २०१९ साली आयसीसी वनडे वर्ल्डकप अव्वल स्थानी होता. वाचा- गुगल सर्चवर एकूणच क्रीडा आणि बातम्या या श्रेणीत सर्वात जास्त सर्च करण्यात आले ते आयपीएलच्या १३व्या हंगामाबाबतच्या माहितीसाठी आणि त्यानंतर क्रमांक येतो तो करोना व्हायरसचा होय. या शिवाय अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीचे निकाल, पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी, बिहार निवडणूक आणि दिल्ली निवडणूक याबाबत अधिक सर्च झाले. वाचा- आयपीएलची उत्सुकता भारत आणि बाहेरच्या देशात आहे. करोना व्हायरसमुळे ही स्पर्धा होणार नाही असे वाटत होते. मार्चमध्ये होणारी आयपीएल या वर्षी रद्द होईल असे वाटत होते. पण आयसीसीने ऑस्ट्रेलियात होणारा वर्ल्डकप पुढे ढकलला आणि बीसीसीआयला आयपीएलच्या आयोजनासाठी वेळ मिळाला. भारतीय क्रिकेट बोर्डाने १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर या काळात युएईमध्ये आयपीएलच्या १३व्या हंगामाचे आयोजन केले. यावर्षी मुंबई इंडियन्सने विक्रमी पाचवे विजेतेपद मिळवले आणि नवा इतिहास घडवला. अंतिम लढतीत त्यांनी दिल्ली कॅपिटल्सचा पराभव केला. या वर्षीच्या आयपीएलचे आणखी एक खास वैशिष्ट म्हणजे दर वर्षी प्ले ऑफमध्ये पोहोचणाही चेन्नई सुपर किंग्ज या वर्षी सातव्या क्रमांकावर राहिली.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3gKxJL3

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...